Uddhav Thackeray on Devendra Fadnavis: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (UBT) यांनी मुंबईतील दादर येथील शिवाजी नाट्यमंदिरात शाखाप्रमुखाच्या वतीने 24 जून शनिवारी सकाळी बैठक घेतली.ह्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ह्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी बीएमसीच्या कोविड सेंटर घोटाळ्याबाबत ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. याचदरम्यान त्यांनी या विषयावर कारवाई करण्यास सांगितले आहे.
कोविडच्या महामारीच्या काळात एकट्या टाटांनी पीएम केअर फंडाला तीन हजार कोटी रुपये दिले. ह्याचा हिशेब कुठे गेला? असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी ह्या बैठकीत मांडला आहे. बीएमसीच्या सुरू असलेल्या भष्ट्राचाराविरोधात उध्दव ठाकरे यांच्याकडून 1 जुलै रोजी महामोर्चा बोलवण्यात आला आहे. ह्या महामोर्चांची जोरदार तयारी चालू आहे. पाऊस जरी असला, तरी मोठ्या संख्येने जनतेला उपस्थित राहण्यास संबोधले आहे.कोविड महामारीच्या काळात बीएमसीच्या भष्ट्राचाराबाबत उध्दव ठाकरे यांनी ईडी आमच्या हातात द्या आणि , कुठे छापे घालायचे ते आम्ही सांगू. आम्ही प्रश्न विचारल्यावर आमच्यावर कारवाई केली जाते, आम्हाला उत्तरे मिळत नाहीत.
कोरोना काळात महाराष्ट्र हे पायाभूत सुविधा देणारे पहिले राज्य ठरले आहे. त्यामुळे जनता ठरवले 'आम्ही हिरो की खलनायक'? पण तुम्ही नालायक आहात ते जनतेला ही माहित आहे. उध्दव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत असताना म्हणाले की, तुम्ही कुटुंबाच्या वर येऊ नका. लक्षात ठेवा की तुमचेही एक कुटुंब आहे. मी कोणाच्या कुटुंबावर बोलत नाही. मी कुटुंबात आलो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. मी उघडपणे म्हणतो 'माझा कुटुंब माझी जबाबदारी' मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत आहे, समोर बसलेले हे लोक माझे कुटुंब आहेत. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेत आहे हे तुम्हाला माहीत आहे.