विचित्र! TRS पक्षाकडून बायको निवडणुक हरली, मत देण्यासाठी दिलेले पैसे परत करा नवऱ्याची मागणी
तेलंगणा राष्ट्र समिती (फोटो सौजन्य- ट्वीटर)

Hyderabad: निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार जनतेला विविध आश्वासने आणि वस्तू देण्याच्या बहाण्याने त्यांची मने जिंकू पाहतात. जेणेकरुन त्यांना निवडणुकीत जास्त मते मिळून विजय मिळवायचा असतो. तसेच विरोध पक्षांवर आरोपप्रत्योप ही केले जातात. याच संबंधित एक विचित्र घटना तेलंगणा येथे घडली आहे.

तेलंगणा (Telangana) येथे सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये टीआरएस (TRS) पक्षातील उमेदवाराचा पती पंचायत निवडणुकीत बायकोचा पराभव झाल्याने घरोघरी जाऊन मत देण्यासाठी वाटप केलेले पैसे पुन्हा मागत असल्याचे त्या व्हिडिओत दिसून येत आहे. तर निवडणुकीपूर्वी नवऱ्याने बायोकाला जिंकून देण्यासाठी तेथील लोकांना पैसे वाटप केले. तर 2014 नंतर तेलंगणात युती झाल्यानंतर पहिल्यांदाच पंचायत निवडणुका घेण्यात आल्या. तर निवडणुकीचा पहिला टप्पा 21 जानेवारी रोजी पार पडला. तसेच दुसरा टप्पा 25 जानेवारी पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यानुसार 25 जानेवारी रोजी मतदान केले गेले. (हेही वाचा-पंतप्रधानांच्या तामिळनाडू दौऱ्याविरुद्ध सोशल मिडियावर आंदोलन; #GoBackModi हॅशटॅग ट्रेंडमध्ये)

तर निवडणुकीसाठी टीआरएस पक्षातून उभ्या राहिलेल्या उमेदवार हिमावती यांचा अखेर पराभवाचा सामना करावा लागला. तर हिमावती या सूर्यपेट जिल्ह्यातील जगीरेड्डीगुडेम मधील वॉर्ड 9 मधून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. तसेच नवऱ्याने बायको मतदान जिंकून येण्यासाठी पैशांचे वाटप केले होते. मात्र बायकोला पराभव स्विकारावा लागल्याने नवऱ्याने घरोघरी जाऊन वाटप केलेल्या गावातील लोकांना दिलेले 500- 700 रुपये परत द्या अशी मागणी करत आहे.