भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचे दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयात दुःखत निधन झाले. स्वराज यांना हृदयविकाराच्या झटकामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या 67 वर्षांच्या होत्या. स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्याच कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे. स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखल्या जायच्या. आपल्या वक्तृवाने स्वराज यांनी भाजपचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर पोहोचवला आहे. मागील वर्षी अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्र (United Nations) महासभेच्या 73 व्या अधिवेशनात स्वराज यांनी भाषण केले. आपल्या भाषणात स्वराज यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला बोल केला. (माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीतील AIIMS रुग्णालयात निधन)
ते म्हणाले, "अनेक दशकांपासून भारत दहशतवादाच्या झळा सहन करीत आहे. आम्हाला शेजारच्या देशाकडूनच दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान न केवळ दहशतवादाला नाकारत आहे तर ते वाढवण्याचे देखील काम तो करीत आहे. त्याने ओसामा बिन लादेन याला लपवून ठेवले होते. पूर्ण सत्य बाहेर आल्यावर देखील त्याच्या चेहर्यावर लाज दिसली नाही. 9/11 चा मुख्य सूत्रधार मारला गेला, पण 26/11 चा मुख्य सूत्रधार हाफिज सईद (Hafiz Saeed0 पाकिस्तानमध्ये (Pakistan) निवडणूक लढवत आहे. भारताने पाकिस्तानशी बर्याच वेळा बोलण्याचा प्रयत्न केला. मी स्वतः इस्लामाबादला जाऊन संभाषण सुरू केले पण लगेच पठाणकोट येथील आमच्या एअरबेसवर हल्ला केला."
मोदी सरकार 1 मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना स्वराज यांनी त्यांच्या कामानं छाप पाडली होती. जगभरातील भारतीयांना त्यांनी अतिशय तत्परतेनं मदत केली. त्याशिवाय सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानसह अनेक देशातील रहिवाशांना त्यांनी माणुसकीच्या नात्यानं वेळोवेळी सहाय्य केलं. तीन तासांपूर्वीच स्वराज यांनी ट्विट करुन काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल मोदी सरकारचं कौतुक केलं होतं. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले होते. 'या क्षणाची मी आयुष्यभर वाट पाहत होते', असं ट्विट करत स्वराज यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.