राम मंदिर मुद्द्यावरुन (Ram Temple Issue) भाजप (BJP) अंतर्गत प्रचंड अस्वस्थता असून, या मुद्द्यावर राज्य राज्य चालवणाऱ्यांकडे कोणतीही ठोस योजना नाही. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजप हायकमांडही निरुत्तर आहे. त्यामुळे आता चिंतन, सहमती, संयममाची भाषा बोलली जात असल्याची खोचक टीका भाजपचा सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेने भाजपवर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena Party Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाचे मुखपत्र दै. सामनामध्ये लिहिलेल्या लेखात राम मंदिरप्रश्नी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानावरुन थेट टीकास्त्र सोडले आहे.
भाजप हायकमांडकडे उत्तर नाही
उद्धव ठाकरे यांनी लेखात म्हटले आहे की, 'अयोध्येत राममंदिर उभारावे यासाठी भारतीय जनता पक्षावर आतूनच दबाव आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत राममंदिर कधी उभारणार ते सांगा? असे विचारले जात आहे व भाजप हायकमांडकडे त्याचे उत्तर नाही. संसदीय पक्षाच्या बैठकीत काही खासदारांनी पुन्हा राममंदिराचा प्रश्न विचारला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘मंदिरप्रश्नी संयम राखा, योग्य वेळी सर्वकाही होईल’ असे उत्तर दिले. याच वेळी नितीन गडकरी यांनी सल्ला दिला आहे. ‘एकमेकांच्या सहमतीने आणि सहकार्याने अयोध्येत राममंदिर उभारावे.’ भाजप अंतर्गत राममंदिरप्रश्नी अस्वस्थता निर्माण झाली आहे व राज्य चालवणाऱ्यांकडे कोणतीही ठोस योजना नाही'.
श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार?
श्रीरामाला चांगले दिवस कधी येणार? असा सवाल विचारत पुढे ठाकरे म्हणतात, 'राजनाथ म्हणतात, ‘संयम.’ गडकरी म्हणतात, ‘सहमती’ व सरसंघचालक सांगतात, ‘रामाचीही वेळ येईल.’ पंचवीस वर्षे राम उघडय़ा तंबूत व आपण सारे सत्तेच्या खुर्च्या उबवत आहोत. पुन्हा राममंदिरावर कोणी काही बोलायचे नाही. राममंदिरावर अध्यादेश काढणे राहिले बाजूला, ज्यांनी मंदिरासाठी बाबरी पाडली त्यांच्यावरचे खटलेही तुम्ही काढू शकत नाही. राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपून जमाना झाला. लालकृष्ण आडवाणी हे राष्ट्रपती होणार नाहीत. तेव्हा बाबरी पतनाचे खटले काढा व बाबरीचे कोर्ट तरी बरखास्त करा. श्री. गडकरी, इथे तरी सहमती होऊ द्या!'
भारतीय जनता पक्षावर आतूनच दबाव
'अयोध्येत राममंदिर उभारावे यासाठी भारतीय जनता पक्षावर आतूनच दबाव आहे. पक्षाच्या प्रत्येक बैठकीत राममंदिर कधी उभारणार ते सांगा? असे विचारले जात आहे व भाजप हायकमांडकडे त्याचे उत्तर नाही. संसदीय पक्षाच्या बैठकीत काही खासदारांनी पुन्हा राममंदिराचा प्रश्न विचारला. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘मंदिरप्रश्नी संयम राखा, योग्य वेळी सर्वकाही होईल’ असे उत्तर दिले. याच वेळी नितीन गडकरी यांनी सल्ला दिला आहे. ‘एकमेकांच्या सहमतीने आणि सहकार्याने अयोध्येत राममंदिर उभारावे.’ भाजप अंतर्गत राममंदिरप्रश्नी अस्वस्थता निर्माण झाली आहे व राज्य चालवणाऱ्यांकडे कोणतीही ठोस योजना नाही', असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.(हेही वाचा, Modi VS Yogi यांच्या पोस्टरबाजीला दणका, UP पोलिसांकडून तिघांना अटक)
भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे
'संयम आणि सहमतीच्या चिपळय़ा वाजवत बसले असते तर पंचवीस वर्षांपूर्वी अयोध्येत बाबरीचा कलंक नष्ट झाला नसता. तेव्हा ‘मंदिर वहीं बनाएंगे’ची भाषा होती व आता संयम, सहमतीची भाषा आहे. भाजपच्या एका खासदाराने बैठकीतच विचारले, ‘संयम कसला? आणि वाद तरी कसला? जर त्या जमिनीवर आता कोणताही ढांचा शिल्लक नाही, तर मग वाद कसला?’ यावर राज्यकर्त्यांकडे उत्तर नाही. पण पाच राज्यांतील विधानसभा निकालांनी भाजपला उत्तर दिले आहे. राजनाथ सिंह व नितीन गडकरी यांनाही वाटते की अयोध्येत मंदिर व्हावे. मंदिर व्हावे ही देशाची इच्छा होती. म्हणूनच भाजपला सत्तेवर आणले पण मंदिर मुद्दा इतर विषयांप्रमाणे ‘जुमलेबाजी’ ठरू लागल्याने भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परम आदरणीय सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुण्यात मंगळवारी मार्गदर्शन केले. ‘जो धर्मासाठी जगतो तो देशासाठी जगतो.’ पण संघाने दिल्लीवर बसवलेले सरकार धर्मासाठी जगते आहे काय?', असा रोखडा सवालही ठाकरे यांनी आरएसएसला विचारला आहे.