Modi VS Yogi यांच्या पोस्टरबाजीला दणका, UP पोलिसांकडून तिघांना अटक
मोदी विरुद्ध योगी (फोटो सौजन्य- Twitter)

पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाची (BJP) लाट ओसरल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर या परभावाचे मुख्य कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांना ठरविले गेले आहे. मात्र मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) मोदी विरुद्ध योगी (Yogi)असे पोस्टर लावण्यात आले होते. तर या पोस्टरबाजीला युपी पोलिसांनी दणका देत तिघांना अटक केली आहे.

उत्तर प्रदेशात निवडणुकीच्या निकालावेळी 'मोदी विरुद्ध योगी' असे वादग्रस्त पोस्टर लावण्यात आले होते. तसेच या पोस्टरमुळे राजकीय पक्षात चर्चा रंगली होती. मात्र नवनिर्माण सेनेच्या संघटनेने ही पोस्टरबाजी केल्याचे समोर आले आहे. तर अमित जानी असे तरुणाचे नाव असून या पोस्टरबाजीमध्ये त्याचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. युपीमध्ये लावल्या गेलेल्या या पोस्टरवर 'जुमलेबाजी का नाम मोदी' असे लिहिले असून त्याखाली 'हिंदूत्व का ब्रॉंड योगी' असे सुद्धा लिहिले आहे.

मात्र युपी पोलिसांनी हे पोस्टर आता काढून काढले आहेत. तसेच या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पोस्टर प्रिंट करणाऱ्या व्यक्तींना ही अटक करण्यात आली आहे.