भाजप (BJP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) जर संविधानातील कलम 370 रद्द करण्याची तारीख ठरवत असतील तर जम्मू-काश्मिर (Jammu-Kashmir) मधील जनतासुद्धा यासाठी तारीख तयार करत असल्याचे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले आहे. तसेच जर कलम 370 रद्द केल्यास भारतासोबत काश्मिरचे असलेले नाते कायमचे दूरावले जाईल.
काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज दाखल केला. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा इशारा आघाडीच्या सरकारला दिला आहे. त्याचसोबत ज्या अटींची पूर्तता करत काश्मिर भारतात सामील झाला आहे त्या अटी मोडीत काढत भारताशी असलेले नाते कायमचे संपवून टाकू असे मुफ्ती यांनी म्हटले आहे.(जम्मू-काश्मिर: जमात-ए-इस्लामी संबंधित संपत्ती सील, सरकारच्या कारवाईला मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून विरोध)
तर संविधानामधील कलम 370 किंवा 35 A हटवल्यास काश्मिर भारतापासून वेगळा होईल. तसेच अमित शहा यांनी 2020 पर्यंत काश्मिर मधून 370 आणि 35 A हटविण्यात येणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. त्यावरुनच आज मुफ्ती यांनी हा इशारा दिला आहे.