Rajya Sabha Election 2020: राज्यसभा निवडणुकीत भाजपची तटबंदी तोडण्याचे काँग्रेस समोर आव्हान, दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह अनेकांच्या रणनितीचा फैसला; मतदान सुरु, आजच निकाल
Voting | Representational Image (Photo Credits: Getty Images)

राज्यसभा निवडणूक 2020 (Rajya Sabha Election 2020) साठी आज (शुक्रवार, 19 जून) 10 राज्यांमध्यून 24 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. मतदानास सुरुवात झाली आहे. यात गुजरात (Gujarat), राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) या काही प्रमुख राज्यांचा समावेश आहे. इतरही काही प्रमुख आणि छोट्या राज्यांमध्येही निवडणूक आहे. मात्र, त्या ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याने मतदान होणार नाही. दरम्यान, कांग्रेस, भाजप आणि इतर पक्षांकडून दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य सिंधिया केशरी सिंह सोलंकी, पुरुषोत्तम सोलंकी यांच्यासारखे दिग्गज नेते मैदानात आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय रणनितीचे भविष्य आज ठरणार आहे.या निवडणुकीचा निकालही आजच लागणार आहे.

खास करुन राजस्थान आणि गुजरात राज्यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष रिसॉर्ट पॉलिटिक्स खेळताना दिसत आहेत. राज्यसभेत भाजप प्रणित एनडीएला बहुमतापासून दूर ठेवण्याचे काँग्रेस आणि युपीएचे प्रयत्न आहेत. तर राज्यसभेत बहुमत मिळविण्यासाठी एनडीएला आणखी 30 जागांची आवश्यकता आहे. त्यासाठी भाजप सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यातून राज्यसभेसाठी प्रत्येकी 3 जागांसाठी 4 उमेदवार (भाजप, काँग्रेस प्रत्येकी 2), गुजरात राज्यातून 4 जागांसाठी 5 उमेदवार (भाजप 3, काँग्रेस 2), झारखंड राज्या 2 जागांसाठी 3 उमेदवार (जेएमएम, भाजप, काँग्रेस प्रत्येकी 1), आंध्र प्रदेश 4 जागांसाठी 5 उमेदवार रिंगणात आहेत. पूर्वेकडील राज्ये मणिपूर, मेघालय आणि मिजोराम या राज्यांध्ये प्रत्येकी एका जागेसाठी मतदान पार पडत आहे.