नाशिक: आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (BMC) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 10 दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरें सोमवारी नाशिकच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकांराशी संवाद साधला आणि वेगवेगळ्या मुद्दयावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांना येत्या सोमवार (13 डिसेंबर) पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता तो आता संपलेला आहे. सोमवारी एसटी कर्मचारी कामावर रुजु न झाल्यास त्याच्यावर काय कठोर कारवाई होणार असे अनिल परब यांना सांगितले होते याच प्रकरणावर राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यानां समर्थन देत आपली भुमिका स्पष्ट केली केली आणि सरकारवर निशाना साधला.
एसटी महामंडळातील भ्रष्टाचार बंद होत नाही तोपर्यंत हा प्रश्न मिटणार नाही. त्यामुळे एसटीचं खासगीकरण करण्यापेक्षा एसटी एखाद्या चांगल्या कंपनीकडे चालवायला का देत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेतले पाहिजे. एसटीचा विषय नीट आपण पाहणं आवश्यक आहे. मला माहिती जी मिळाली आहे, त्याप्रमाणे चुकीची असं मला वाटत नाही. या सगळ्यामध्ये एसटी कर्मचारी सर्व संघटना बाजूला करून एकवटले आहेत. तुमच्या हातात जे राज्य दिल ते चालवण्यसाठी देल आहे अरेरावी करण्यासाठी नाही दिल आहे. (हे ही वाचा ST Workers Strike: अल्टिमेटम संपला! एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार, आतापर्यंत 10 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन.)
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने समजुन घेतल पाहिजे, तसेच त्यांची दिवाळी ही बिन पगारात गेली आहे तीन - चार महिने त्याचां पगार होत नाही त्यामुळे त्याच्यावर खुप वाईट परिस्थिती आली आहे. तसेच सगळ्या संघटना सोडुन सगळे कर्मचारी एकत्र आले आहे. या प्रश्नावर लवकरात लवकर उत्तर मिळवुन ही समस्या सोडवली पाहिजे असे राज ठाकरें म्हणाले आहे.