ST Bus Employee Strike: राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे बसच्या सेवेवर मोठा परिणाम होत आहे. अद्यापही कामगारांकडून संप काही ठिकाणी सुरु आहे. त्यांच्या विविध मागण्यांपैकी पगार वाढीची मागणी पूर्ण झाली आहे. परंतु अद्याप विलिकरणाच्या मुद्द्यावरुन कामगार ठाम असल्याचे संप सुरुच ठेवला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी कर्मचाऱ्यांना येत्या सोमवार (13 डिसेंबर) पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता तो आता संपलेला आहे. सोमवारी एसटी कर्मचारी कामावर रुजु न झाल्यास त्याच्यावर काय कठोर कारवाई होणार असे अनिल परब यांना सांगितले होते. आतापर्यंत एसटीचे जवळपास साडेपाचशे कोटींचं नुकसान झालंय. एसटी कर्मचारी पगारवाढ देऊनही कामावर परत नसल्यानं राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची चाचपणी सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अनिल परब यांनी दिलेली मुदत आज संपत असल्यानं राज्य सरकार कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.
आतापर्यंत 10 हजार कर्मचाऱ्यांचं निलंबन
महामंडळाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत साधारणपणे दहा हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. एसटीच्या एकूण 93 हजार कर्मचाऱ्यांपैकी आतापर्यंत 20 हजार कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. तर तब्बल 2 हजाराच्या असपास एसटी कर्मचाऱ्यांवर सेवासमाप्तीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांना दगडफेकीच्या घटनांना सामोरे जावं लागतंय, दुसरीकडे संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावं लागत आहे. (हे ही वाचा Sanjay Raut: भाजपा कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नवी दिल्लीत गुन्हा दाखल, राजकीय हेतुने माझा आवाज दाबण्याच प्रयत्न - संजय राऊत.)
काय म्हणाले होते अनिल परब
काही कर्मचाऱ्यांनी निलंबन होईल त्या भीतीपोटी कामावर रुजू होत नाही आहेत. तसेच काहींनी आत्महत्या सुद्धा केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे प्रकार होऊ नयेत आणि निलंबन मागे घेतले जाईल यासाठी एक संधी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. परंतु त्यानंतर मात्र कर्मचारी कामावर रुजु झाले नाहीत तर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा अनिल परबांनी दिला आहे. महत्वाचे म्हणजे जवळजवळ 20 हजार कर्मचारी आतापर्यंत कामावर रुजु झाल्याने 127 डेपो मधील एसटी बसचे संचालन सुरु झाले आहे.