Rahul Gandhi And Prashant Kishor (Photo Credits-Twitter)

सध्या दिल्ली मध्ये राजनिती रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) भाजपाच्या विरोधक राजकीय पक्षांची घेत असलेली भेट चर्चेचा विषय बनला आहे. आशी शरद पवार आणि आता राहुल गांधींसोबत (Rahul Gandhi)  झालेल्या भेटीचे काय प्रतिसाद उमटणार याची उत्सुकता आहे. ANI ने कॉंग्रेस सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, काल राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये प्रशांत किशोर यांनी Priyanka Gandhi Vadra, KC Venugopal आणि सोनिया गांधी यांच्यासोबत देखील बातचीत केली आहे. यामध्ये UPA च्या अध्यक्ष पदी शरद पवार यांच्या नावाची चर्चा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे तर लोकसभेतही लीडर ऑफ कॉंग्रेस बदलणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसभेमध्ये Leader of Congress म्हणून Adhir Ranjan Chowdhury हेच या पावसाळी अधिवेशनामध्ये काम पाहणार आहेत. सोनिया गांधी यांनी Congress interim chief Sonia Gandhi यांची ऑनलाईन तासभर चर्चा केली आहे. दरम्यान आगामी विधानसभा निवडणूकांबाबतही प्रशांत किशोर यांच्यासोबत चर्चा झाल्याचं समजते आहे.

ANI Tweet

पंजाब कॉंग्रेस मध्ये सध्या राजकीय अवस्थता आहे त्यामुळे त्याची चर्चा झाली का? हा प्रश्न देखील अनेकांना होता पण त्याबद्दल चर्चा झाली नसल्याचं वृत्त समोर येत आहे. 2024 ला देशात लोकसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे त्याच्या अनुषंगाने प्रशांत किशोर यांच्या या भेटी-गाठींना देखील विशेष महत्त्व आले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा चर्चेत आले. त्यावेळेस त्यांनी यापुढे कोणत्याही राजकीय पक्षासाठी काम करणार नसल्याचं जाहीरकेले होते.

आज महाराष्ट्रात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील 2024 च्या लोकसभा निवडणूकीबद्दल आम्ही स्वतंत्र निर्णय घेऊ असं म्हटलं आहे.