पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला युरोपिन संसदेच्या सदस्यांची टीम, 29 ऑक्टोबरला जम्मू-कश्मीर दौरा करणार
PM Narendra Modi (Photo Credits-ANI)

भारताच्या दौऱ्यावर आलेल्या युरोपियन संसदीय सदस्यांची टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत एक बैठक पार पाडली. त्यानंतर आता उद्या (29 ऑक्टोबर) सदस्यांची टीम जम्मू-कश्मीरचा दौरा करणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या गाठीभेटीनंतर खासदारांना संबोधित करत असे म्हटले आहे की, तुम्हाला जम्मू-कश्मीरसह अन्य ठिकाणांवरील संस्कृती आणि धार्मिक विविधतेचा एक अनुभव घेता येणार आहे. त्याचसोबत पाकिस्तानचे नाव न घेता दहशतवादाच्या विरोधात एकजूट होण्याची गरज असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी यांनी संसदेच्या सदस्यांना उद्देशून असे म्हटले आहे की, दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी जवळच्या एका आंतरराष्ट्रीय देशाची साथ असणे फार गरजेचे आहे. दहशतवाद्यांच्या विरोधात आणि अशा देशाच्या विवरुद्ध आवाज उठवणे अत्यावश्यक आहे. भारत युरोपियन सोबत असलेल्या नातेसंबंध अधिक वाढवण्यासाठी महत्व देत आहे. तर जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विदेशातील प्रतिनिधीमंडळाने येथे दौरा करण्यास आले आहेत.(Mann Ki Baat: 'मन की बात' कार्यक्रमातून दीपावलीच्या शुभेच्छा; पहा वल्लभभाई पटेल जयंती ते राम मंदिर प्रकरण सुनावणी बाबत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?)

ANI Tweet: 

ANI Tweet:

असे सांगितले जात आहे की, या प्रतिनिधीमंडळात एकूण 28 जण आहेत. केंद्र सरकारच्याद्वारे 5 ऑगस्ट रोजी कश्मीर मधून कलम 370 हटवण्यात आल्यानंतर भारताला युरोपियन युनियन कडून समर्थन मिळाले होते. तसेच युनियनने पाकिस्ताच्या वागण्याबाबत खुलासा करत जम्मू-कश्मीरचा मुद्दा हा द्वीपक्षीय असल्याचे म्हटले होते. मात्र त्यावेळी पाकिस्तानवर युरोपियन युनियन ही दहशतवादाला खतपाणी देत असल्याच्या कारणावरुन जोरदार सुनावले होते. भारताला समर्थने देणे आवश्यक आहे कारण पाकिस्तानला दहशतवाद्यांमुळे संरक्षण मिळत आहे. त्यामुळेच ते बाजूच्या देशांवर हल्ले घडवून आणत आहेत.