Mann Ki Baat: 'मन की बात' कार्यक्रमातून दीपावलीच्या शुभेच्छा; पहा वल्लभभाई पटेल जयंती ते राम मंदिर प्रकरण सुनावणी बाबत काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
Maan Ki Baat | Photo Credits: Twitter

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (27 ऑक्टोबर) मन की बात हा ओकतोबर महिन्यातील मासिक कार्यक्रम पार पडला आहे. केंद्र सरकारमध्ये सत्तेत आल्यानंतर दर महिन्याला रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमाची सुरूवात केली आहे. आज दिवाळीच्या सणामधील नरक चतुर्दशी दिवशी 'मन की बात' च्या एपिसोडमध्ये नरेंद्र मोदींनी भारतीयांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच राम मंदीर, गुजरातमध्ये उभारलेला 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' सोबतच फेस्टिवल टूरिझम यावर भाष्य केलं आहे. सध्या जगभरात 'फेस्टिवल टुरिझम'चं विशेष आकर्षण आहे. आता दीपावली हा सण केवळ भारतापुरता मर्यादीत राहिलेला नाही तर तो जगभर तितक्याच उत्सहाने साजरा केला जात असल्याचं म्हटलं आहे. आता आपल्यामधील शत्रूत्वाच्या भावनेवर मात करून पुढे जायला शिका असा सल्ला देखील त्यांनी भारतीयांना दिला आहे.

जगभरात दिवाळी साजरी केली जात असल्याने आता केवळ भारतीय दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी नसतात तर जगभरातील स्थानिक लोकंही परदेशात भारतीयांकडून केल्या जाणार्‍या दिवाळी सेलिब्रेशनचा एक भाग बनतात. आज लक्ष्मी पूजना दिवशी भारतीय स्त्रियांचा सन्मानाचा, नारी शक्तीचा गौरव झाला पाहिजे असेही मोदींनी म्हटले आहे.

ANI Tweet 

आज मन की बातमध्ये नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना 31 ऑक्टोबर या तारखेचीदेखील आठवण करून दिली आहे. भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई यांचा हा जन्म दिन आहे. देशाला एकतेच्या सूत्रामध्ये बांधून ठेवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. 'मॅन ऑफ डिटेल' अशी ओळख असणार्‍या वल्लाभभाई पटेल यांना आदरांजली अर्पण केली आहे. तर यंदाही त्यांच्या जयंतीचं औचित्य साधत भारत सरकार कडून 'रन फ़ॉर युनिटी' याच आयोजन करण्यात येणार आहे. 'एक लक्ष्य- एक भारत, श्रेष्ठ भारत' या विचारधारेवर विश्वास ठेवत देश एका दिशेने प्रगती करत असल्याचं म्हटलं आहे.

ANI Tweet 

आज मन की बात कार्यक्रमामध्ये यासोबतच इंदिरा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांचं स्मरण करण्यात आलं आहे. सोबतच राम मंदिर प्रकरणीदेखील भाष्य केले आहे.