PM Modi | Twitter

2024 च्या लोकसभा निवडणूका आता अवघ्या काही महिन्यांच्या टप्प्यांत आल्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी तयारीला लागले आहेत. बंगळूरू मध्ये देशभरातील विरोधक 26 राजकीय पक्ष भाजपा ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आज बैठक घेत आहेत. या विरोधकांच्या बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टीपण्णी केली आहे. घराणेशाहीला प्रोत्साहन देत असलेले हे विरोधक लोकशाही आणि संविधानाला बंधक बनवत आहेत. त्यांच्यासाठी मी एवढेच सांगू इच्छितो - द्वेष आहे, घोटाळे आहेत, तुष्टीकरण आहे, मन काळे आहे, देश अनेक दशकांपासून कुटुंबवादाच्या आगीत होरपळत आहे.

देशात कुठे पूर घोटाळा होतो, कुणाचे अपहरण होते, मग सर्व कुळातील लोक गप्प होतात. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत उघड हिंसाचार, सतत रक्तपात झाला, यावरही कोणीच काहीही बोलत नाही. काँग्रेस आणि डाव्यांचेच कार्यकर्ते तिथे स्वत:ला वाचवण्यासाठी विनंती करत आहेत, पण काँग्रेस आणि डाव्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वत:च्या हितासाठी मरण्यासाठी तिथे सोडले आहे. असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे.

पहा ट्वीट

तामिळनाडूमध्ये भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत, परंतु त्यांच्या घराण्यातील सर्व पक्षांनी याआधीच सर्वांना क्लीन चिट दिली आहे. या लोकांच्या कारस्थानांमध्ये देशाच्या विकासासाठी आपल्याला स्वतःला झोकून द्यावे लागेल. तपास यंत्रणांच्या कारवाईवर मोदींनी बोलताना दारू घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई झाली, हे लोक त्या पक्षाला वाचवू लागतात. एजन्सी आपले काम करते तेव्हा षडयंत्र असल्याचे सांगितले जाते. तामिळनाडूतही घोटाळे कसे बाहेर येत आहेत हे आपण पाहिले. त्यांना कारस्थान करू द्या, आम्ही देशासाठी काम करत राहू. नक्की वाचा: Ex-Kerala CM Oommen Chandy यांच्या निधनाने आपण एक नम्र आणि समर्पित नेता गमावला- पंतप्रधान Narendra Modi.

विरोधी पक्षांची दुसरी संयुक्त बैठक 17-18 जुलै रोजी बेंगळुरू येथे होत आहे. 23 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांची पहिली बैठक झाली होती.