पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्त्वाखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठाकीमध्ये ' एक देश एक निवडणूक' विधेयकाला (One Nation One Election Bill) मंजुरी मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आता हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक सादर होईल असा अंदाज आहे. या निर्णयाचे पालन करून एक सर्वसमावेशक विधेयक अपेक्षित आहे, ज्यामुळे देशभरात एकत्रित निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल. चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडण्याचा सरकारचा विचार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने या वर्षी सप्टेंबरमध्ये लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्यासाठी ‘एक देश, एक निवडणूक’ लागू करण्यास मान्यता दिली होती. PM Narendra Modi Interview: 'वन नेशन, वन इलेक्शन'साठी आमची कटिबद्धता, नरेंद्र मोदी यांचे मोठं वक्तव्य .
'वन नेशन वन इलेक्शन' ला मंत्रिमंडळाची मंजुरी
Union Cabinet has approved 'One Nation One Election' Bill: Sources pic.twitter.com/uAsIyjNcCv
— ANI (@ANI) December 12, 2024
2 टप्प्यातील मतदान घेण्याची शिफारस
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीने मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी अहवाल सादर केला होता. मंत्रिमंडळासमोर अहवाल सादर करणे हा कायदा मंत्रालयाच्या 110 दिवसांच्या कार्यसूचीचा एक भाग होता.पॅनेलने लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस केली होती, त्यानंतर 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात. पॅनेलने भारतात 2 टप्प्यातील मतदान घेण्याची शिफारस केली होती. दरम्यान कमिटी कडून 'वन नेशन वन इलेक्शन' लागू करण्यासाठी 18 घटनात्मक सुधारणांची शिफारस देखील केली आहे.
सध्या दिल्लीत सुरू असलेले संसदेचं हिवाळी अधिवेशन 20 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात हे विधेयक येण्याचा अंदाज आहे.