PM Narendra Modi Interview: 'वन नेशन, वन इलेक्शन'साठी आमची कटिबद्धता, नरेंद्र मोदी यांचे मोठं वक्तव्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी जनतेला दिलेल्या सर्व गॅरंटी पूर्ण करणार असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच देशात 'वन नेशन, वन इलेक्शन' धोरण लागू होणार, अशी चर्चा आहे. यावरच बोलताना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ''वन नेशन, वन इलेक्शनसाठी आमची कटिबद्धता आहे. अनेक लोकांनी यासंबंधित समितीला आपल्या सूचना दिल्या आहेत. अनेक सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना आल्या आहेत. जर आम्ही हा अहवाल अंमलात आणू शकलो, तर देशाला खूप फायदा होईल.'' असे मोदी यांनी म्हटले आहे.

पाहा पोस्ट -

या मुलाखतीत मोदी यांनी म्हटले की "पुढील  वर्षांचा प्लॅन तयार आहे. अनेक कामं झाले आहेत, पण आणखी खूप काम करायचं आहे. कामांना गती द्यायची आहे." एक राष्ट्र एक निवडणूक ही आमची बांधिलकी आहे. आम्ही संसदेतही बोललो आहोत. आम्ही एक समितीही बनवली आहे. समितीचा अहवालही आला आहे. त्यामुळे एक राष्ट्र एक निवडणूक या संदर्भात अनेक लोक देशात अनेकांनी आपल्या सूचना दिल्या आहेत. असे त्यांनी सांगितले

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, ''विरोधकांचा जाहीरनामा देशात पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांच्या आकांक्षा धुळीस मिळवतो. जर आपण याचं संपूर्ण विश्लेषण केलं तर, नवीन मतदारांचे वय 25 वर्षांपेक्षा कमी आहे. हा जाहीरनामा त्यांचे भविष्य उद्ध्वस्त करेल.