मेनका गांधी ( फोटो सौजन्य - ट्विटर )

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडमध्ये मीटू च्या वादळाने डोके वर काढले होते. त्यानंतर अनेकांनी आपल्यावर झालेल्या लैंगिक आरोपाचे उघडपणे सोशल मीडियावर सांगितले होते. त्यानंतर हे मीटू चे वादळ आता थेट आकाशवाणीत येऊन धडकले आहे. त्यामुळे केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी माहिती प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांना या प्रकरणी पत्र लिहिले आहे.

आकाशवाणीतील काही सहकाऱ्यांनी मीटू प्रकरणी केलेल्या आरोपांची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच महिलांच्या सुरक्षितेसाठी कडक नियमावली तयार करुन त्यांना अशा गोष्टींना बळी पडण्यापासून वाचवावे असे मेनका गांधी यांनी या पत्राद्वारे लिहिले आहे. तसेच आकाशवाणीत झालेल्या सहकाऱ्यांच्या छेडछाडीची प्रथम काटेकोरपणे दखल घेतली नाही.

मात्र आता मेनका गांधी यांनी या पत्राद्वारे या आरोपांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे राज्यवर्धन राठोड या प्रकरणी कोणती ठोस पावले उचलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.