महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशात थैमान कोरोनाने (Coronavirus) थैमान घातले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात गेल्या वर्षी लॉकडाऊन (Lockdown) घोषित करण्यात आले होते. दरम्यान, अनेकांना आर्थिक संकटाच्या सामोरे जावा लागले होते. महत्वाचे म्हणजे, लॉकडाऊनचा फटका सर्वानाच बसला, व्यवसाय ठप्प झाले, लाखो बेरोजगार झाले. मात्र, या काळात सर्वाधिक हाल हे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांचे झाले आहेत. मात्र, देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांत वाढ होऊ लागल्याने लॉकडॉऊन लागू करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, लॉकडाऊन करण्याआधी सरकारने सामान्य व गरीब परिवाराला रोख 20 हजार रुपये द्यावे मग खुशाल लॉकडाऊन करावे, अशी अट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) ठेवली आहे.
"मागील वर्षभर आपण सर्वच जण अनेक प्रकारच्या अडचणी ना सामोरे जात आहोत. पण खरी अडचण होते ती गरीब लोकांची , ज्यांना रोज काम केल्याशिवाय पर्याय नाही. जनतेने मागील वर्षात सरकार चे निर्देश कडकपणे पाळले, थाळ्या हि वाजवल्या आणि "कोमट पाणी" हि प्यायले. परंतु, आपल्या राज्यात जी कोरोना वाढ झाली त्याचे गूढ उकलेना. तिथे बंगाल, तामिळनाडू मध्ये सर्व नियम पायदळी तुडवून लाखोंच्या प्रचार सभा चालू आहे तिथे कसा कोरोना वाढत नाही? तसेच राज्यात उच्चभ्रू लोकांच्या पब मधे वारंवार सर्व नियमाचा फज्जा उडविला जात आहे. याचा फटका सर्व सामन्य जनतेला बसतो आहे. आधीच लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, आता लोक हा आर्थिक ताण अजिबात सहन करू शकत नाही. सरकारने खुशाल लॉकडाउन करावे, पण सामान्य आणि गरीब परिवाराला रोख 20 हजार रुपये द्यावे", अशी अट मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारसमोर ठेवली आहे. हे देखील वाचा- बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त Iqbal Singh Chahal यांनी घेतली COVID 19 ची लस
बाळा नांदगावकर यांचे ट्वीट-
लॉक डाउन से डर नही लगता है, गरिबी से लगता है
मागील वर्षभर आपण सर्वच जण अनेक प्रकारच्या अडचणी ना सामोरे जात आहोत. पण खरी अडचण होते ती गरीब लोकांची , ज्यांना रोज काम केल्याशिवाय पर्याय नाही. जनतेने मागील वर्षात सरकार चे निर्देश कडकपणे पाळले, थाळ्या हि वाजवल्या व "कोमट पाणी" हि
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) March 30, 2021
बाळा नांदगावकर यांचे ट्वीट-
तर सर्व सामान्य जनतेला. आधीच लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, आता लोक हा आर्थिक ताण अजिबात सहन करू शकत नाही.
सरकार ने खुशाल लॉक डाउन करावे पण सामान्य व गरीब परिवाराला रोख 20000 रुपये द्यावे व मग लावा कि लॉक डाउन.
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) March 30, 2021
दरम्यान, राज्यात लॉकडाऊनला विरोध वाढत आहे. औरंगाबाद शहरातही लॉकडाऊनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे. तसेच तेथील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे.