अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान बनवायला हवे होते- प्रियांका गांधी
प्रियंका गांधी (Photo Credits: Twitter@INC)

लोकसभा निवडणूकीच्या (Lok Sabha Elections) सातव्या टप्प्यातील मतदान रविवारी (19 मे) पार पडणार आहे. तत्पूर्वी राजकीय पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर आता काँग्रेस (Congress) पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priynaka Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

प्रियांका गांधी यांनी असे म्हटले आहे की, तुम्ही एका मोठ्या अभिनेत्याला पंतप्रधान बनवले आहे. त्यापेक्षा अमिताभ बच्चन यांना पंतप्रधान बनवले असते तर बरं झाले असते. कारण कोणालाही तुमच्यासाठी कोणतेच काम करायचे नसल्याची टीका त्यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील एका सभेत त्यांनी अशी मोदी यांच्यावर टीका केली आहे.(Alwar Gangrape Case: राहुल गांधी यांच्या भेटीनंतर अलवार येथील बलात्कार पीडित कुटुंबाला न्यायाबद्दल दिलासा)

यापूर्वी मोदी यांनी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्याबद्दल टीप्पणी केली होती. तर मोदी हे दुर्योधनाचा अवतार असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले होते.