पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credits: PTI)

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेत आल्यापासून जनतेच्या प्रश्नांची उत्तरे दिली नसल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे विरोधकांना प्रतिउत्तर देण्यासाठी आता नरेंद्र मोदी येत्या 26 एप्रिल रोजी वाराणसी (Varanasi) येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. तर सत्तेत आल्यानंतर प्रथमच मोदी पत्रकार परिषद घेणार असल्याने सर्वांचे लक्ष आता याकडे लागले आहे.

वाराणसी येथी हॉटेल ताज गंगा येथे दुपारी 12.30 मिनिटांनी नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. तर वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ही पत्रकार परिषद पार पडणार आहे. परंतु गेल्या 5 वर्षांपासून सत्तेत आल्यानंतर एकदासुद्धा मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली नाही. त्यामुळे पत्रकरांच्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी मोदी घाबरतात आणि विविध पद्धतीच्या टीका त्यांच्यावर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता प्रथमच मोदी यांची पत्रकार परिषद होणार असल्याचे सर्वांमध्ये याबद्दल उत्सुकता वाढली असून मोदी या परिषदेचा सामना कसा करणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.(हेही वाचा-'रोड शो' संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहवाल सादर करावा, निवडणुक आयोगाचे आदेश)

तसेच मनसे अध्यक्ष यांनी सुद्धा वारंवार नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नसल्याने त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. तसेच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा राफेल कररावरुन उत्तरे देण्यासाठी मोदी घाबरत असल्याचे म्हटले होते.