Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूकीसाठी यंदा सात टप्प्यात मतदान पार पडले. तर आज (19 मे) सातव्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व देशातील जनतेचे लक्ष आज जाहीर होणाऱ्या एक्झिट पोलकडे लागून राहिले आहे.
तर एक्झिट पोलच्या आधारे निवडणूकीसाठी जाहीर होणारा निकाल हा कोणत्या पक्षाच्या बाजूने दाखवला जातो याचा अंदाज बांधला जातो. त्यामुळे आज संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोल जाहीर करण्यात येणार असल्याचे शक्यता दर्शवली जात आहे. Network 18 लोकमत-IPSOS कडून जाहीर करण्यात येणारा एक्झिट पोल तुम्हाला त्यांच्या यु-ट्युब चॅनलवर पाहता येणार आहे.
Network 18 लोकमत-IPSOS कडून दाखवण्यात येणारा एक्झिट येथे पाहा-
Network 18 लोकमत-IPSOS वरील एक्झिट पोल YouTube वर पाहा. तसेच देशात इंडिया टुडे-अॅक्सिस, एबीपी-नेल्सन, इंडिया टीव्ही-CNX या संस्था, न्यूज चॅनल्स आपले अंदाज आज व्यक्त करणार आहेत.
News 18 लोकमत पहिल्या टप्प्यातील 91 जागांवरील एक्झिट पोल:
भाजप+: 38-42
काँग्रेस+: 4-7
इतर: 43-46
News 18 लोकमत दुसऱ्या टप्प्यातील देशातील 95 जागांवरील एक्झिट पोल:
भाजप+: 50-54
काँग्रेस+: 31-35
इतर: 8-10
News 18 लोकमत तिसऱ्या टप्प्यातील देशातील 116 जागांवरील एक्झिट पोल:
भाजप+: 71-75
काँग्रेस+: 14-18
इतर: 25-27
News 18 लोकमत चौथ्या टप्प्यातील देशातील 72 जागांवरील एक्झिट पोल:
भाजप+: 53-57
काँग्रेस+: 2-4
इतर: 13-15
News 18 लोकमत पाचव्या टप्प्यातील देशातील 50 जागांवरील एक्झिट पोल:
भाजप+: 36-39
काँग्रेस+: 3-7
इतर: 6-7
लोकसभा निवडणूक 2019 देशातील एकूण 542 जागांवरील एक्झिट पोल
भाजप+: 336
काँग्रेस+: 82
इतर: 124
तर येत्या 23 मे नंतर लोकसभा निवडणूकीचे अंतिम निकाल जाहीर केले जाणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक पक्षाने लोकसभा निवडणूकीच्या प्रचारावेळी जोरदार तयारी केल्याचे सुद्धा दिसून आले होते. त्यामुळे यंदा कोणाचे सरकार येणार किंवा कोणाला बहुमत मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.