काँग्रेस पक्षाचे प्रचारगीत वादाच्या भोवऱ्यात, कॉपीराईटवरुन राहुल गांधी यांना पत्र
Congress flags | Representational image | (Photo Credits: PTI)

लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) काँग्रेस (Congress) पक्षाने त्यांचे प्रचारगीत प्रसिद्ध केले आहे. हे प्रचारगीत सध्या विविध जाहिरांतासाठी वापरले जात असले तरीही आता ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. धनबाद (Dhanbad) येथील निवृत्त कर्नल यांच्या पत्नी यांनी या गाण्याचे बोल लिहिल्याचा दावा केला आहे. याबद्दल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र पाठविले गेले आहे.

मैं ही तो हिंदुस्तान हूं असे गाण्याचे बोल आहेत. तर कर्नल जे के सिंह यांना हा दावा केला असून त्याचे बोल पत्नीचे लिहिलेल्या कवितेमधील असल्याचे म्हटले आहे. 25 फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या उद्घाटनावेळी त्यांनी हे गाणे नॅशनल स्टेडियमवर 20 हजार माजी सैनिकांच्या समोर गायले होते.(हेही वाचा-'चौकीदार चौर हैं' विधान राहुल गांधी यांना भोवले, सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस)

तर सिंह यांनी कविता संग्रहाचे प्रकाशन जलियानवाला बाग येथे 13 एप्रिल 2012 रोजी केले होते. मात्र काँग्रेस पक्षाकडून तयार करण्यात आलेल्या प्रचारगीतामधील बोल हे या गाण्याच्या संग्रहातून प्रेरित आहेत. त्यामुळे कॉपीराईटचा प्रकार उघडकीस आला आहे.