बसपा अध्यक्ष मायावती (फोटो सौजन्य- ट्वीटर)

Lok Sabha Elections 2019: बहुजन समाज पार्टी (BSP) अध्यक्ष मायावती (Mayawati) यांनी युपी (Utter Pradesh) येथून निवडणुक लढवण्यासाठी उमेदवारांची यादी शुक्रवारी (22 मार्च) जाहीर केली आहे. सपा-बसपा गठबंधन अंतर्गच 38 जागांवर लढण्याचा निर्णय घेणाऱ्या बसपाने त्यांच्या 11 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. सहारनपुर मधून पक्षातील हाजी पजर्लुरहमान यांना तिकिट देण्यात आले आहे, तर अमरोहा येथून कुंवर दानिश अली यांना तिकिट देण्यात आले आहे.

दानिश अली यांनी नुकतीचा जेडीएस (JDS) पक्ष सोडला असून बसपा पक्षात प्रवेश केला आहे. तेव्हापासूनच अली यांना अमरोहा मधून तिकिट देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. मेरठ येथे भाजपचे राजेंद्र अग्रवाल यांच्या समोर पक्षाने त्यांचा दिग्गज नेता मोहम्मद यांना तिकिट दिली आहे. हाजी याकूब हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे ओखळले जातात. युपी निवडणुकीदरम्यान भाजप आणि आरएसएस वरुन वादग्रस्त विधाने केले होती.

मायावती ट्वीट:

उमेदवार यादी

सहारनपुर- हाजी फजर्लरहमान

बिजनौर- मलूक नागर

नगीना- गिरिश चंद्र

अमरोहा- कुंवर दानिश अली

मेरठ- हाजी मोहम्मद याकूब

गौतमबुद्धनगर- सतबीर नागर

बुलंदशहर- योगेश वर्मा

अलीगढ- अजीत बालियन

आगरा- मनोज कुमार सोनी

फतेहपुर सीकरी- राजवीर सिंह

आंवला- रुचि वीरा

बसपाने सतबीर नागर ह्यांना गौतमबुद्धनगर येथून तिकिट दिले असून त्याची टक्कर भाजप नेता केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्यासोबत होणार आहे. तसेच या यादीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, जागांवर जातीय समीरकरणांवर खास लक्ष देण्यात आले आहे. तर गठबंधन अंतर्गत बसपा युपीमध्ये (38), सपा (370) आणि रालोद (3) जागांसाठी निवडणुक लढवणार आहे.