Lok Sabha Election Results 2019: महाराष्ट्रात पिछाडीवर असलेले प्रमुख चेहरे; दिग्गजांना धक्का
(Photo credit: archived, modified, representative image)

Lok Sabha Election Results 2019: लोकसभा निवडणूक 2019 साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी देशभरात सुरु आहे. महाराष्ट्रातही ही मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आघाडी घेताना दिसत आहेत. तर, त्या तूलनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिछाडीवर जाताना दिसतात. राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा घडवून आणलेल्या वंचित बहुजन आघाडीलाही एक अपवाद वगळता फारसे आशादाई चित्र पाहायला मिळत नाही. या पार्श्वभूमिवर राज्यात पराभवाच्या छायेत असलेल्या चर्चित उमेदवारांवर टाकलेला हा कटाक्ष.

शिवसेनेचे अनंत गिते - रायगड, चंद्रकांत खैरे - औरंगाबाद, राष्ट्रवादीचे पार्थ पवार - मावळ, काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर, प्रिया दत्त आणि राजू शेट्टी हातकणंकले येथून पराभवाच्या छायेत

पिछाडीवर असलेले प्रमुख चेहरे

  • रायगड - अनंत गिते - शिवसेना
  • मावळ - पार्थ पवार - राष्ट्रवादी
  • नांदेड - अशोक चव्हाण - काँग्रेस
  • नाशिक - समिर भुजबळ - राष्ट्रवादी
  • उत्तर मुंबई - उर्मिला मातोंडकर - काँग्रेस
  • उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्तक - काँग्रेस
  • सोलापूर - सुशिल कुमार शिंदे
  • औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
  • हातकणंगले - राजू शेट्टी

(हेही वाचा, Lok Sabha Election Results 2019: उर्मिला मातोंडकर पिछाडीवर गोपाळ शेट्टी 60000 हजार मतांनी आघाडीवर)

दरम्यान, देशभरातून मतमोजणीची आकडेवारी हाती येत आहे. अर्थात हाती आलेली आकडेवारी ही केवळ कल आहेत. अद्याप मतमोजणी सुरु आहे. ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे हे कल बदलूही शकतात तसेच, आघाडी आणि पिछाडीतही बदल होऊ शकतात. अंतिम निकाल गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळपर्यंतच हाती येण्याची शक्यता असली तरी 'विजेता कोण?' हे चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अंतिम निकाल हाती येईपर्यंत वाट पाहणे हेच महत्त्वाचे आहे.