कर्नाटक (Karnataka) मधील माजी मुख्यमंत्री (CM) आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे वरिष्ठ नेते सिद्धारमैया (Siddaramaiah) यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केल्यानंतर आता त्यांचा दुसरा प्रताप समोर आला आहे. सिद्धारमैया यांनी त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्याला मीडियासमोर कानशीलात लगावल्याची बाब आता समोर आली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
विमानतळावर पोहचलेल्या मीडियाने सिद्धारमैया यांना मीडियाने घेरले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पक्षातील काही कार्यकर्तेसुद्धा होते. मात्र मीडियासोबत बोलून झाल्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला कानाखाली मारल्यानंतर पुढे ढकलत सिद्धारमैया तेथून निघुन जाताना दिसले. मात्र कोणत्या कारणावरुन कार्यकर्त्याला त्यांनी कानाखाली मारले हे स्पष्ट झालेले नाही.(कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार यांना Money Laundering प्रकरणात ED कडून अटक)
ANI Tweet:
#WATCH: Congress leader and Karnataka's former Chief Minister Siddaramaiah slaps his aide outside Mysuru Airport. pic.twitter.com/hhC0t5vm8Q
— ANI (@ANI) September 4, 2019
यापूर्वी सुद्धा सिद्धरमैया यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडले आहे. तर एका पत्रकाराने कर्नाटकमधील सरकार पडल्याचे खापर जेडीएस कार्यकर्त्यांवर का लावत आहात असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी उत्तर देताना सिद्धरमैया यांनी 'ज्या वेश्या डान्स करु शकत नाहीत त्या डान्स फ्लोरवर नाचण्यासाठी चांगल्या नाहीत' असे वादग्रस्त विधान केले होते.