Kamal Haasan (Photo Credits: ANI)

काही दिवसांपूर्वीच अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी नथुराम गोडसे (Nathuram Godse) हे स्वतंत्र भारताचे पहिले हिंदू दहशतवादी आहेत, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रीया उमटत होत्या. आपल्या या विधानावर आज पुन्हा एकदा मक्कम निधी मय्यमचे संस्थापक कमल हसन म्हणाले की, "मला कोणाला अटक करायची असेल तर करु द्या. अटकेला मी घाबरत नाही. जर त्यांनी असे केले तर समस्या अधिक वाढतील. ही ताकीद नाही तर हा सल्ला आहे."

ANI ट्विट:

त्रिची (Trichy) येथील रॅलीत दगडफेक आणि हल्ल्यावर प्रतिक्रीया देताना कमल हसन म्हणाले की, "राजकारणाचा स्तर घसरत आहे. मला भीती वाटत नाही. प्रत्येक धर्माचे दहशतवादी असतात. विशिष्ट धर्माचा म्हणून पवित्र असं आपण म्हणू शकत नाही. कट्टरवाद हा प्रत्येक धर्मात आहे, हे इतिहास सांगतो."

ANI ट्विट:

चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हसन यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना नथुराम गोडसे हिंदू दहशतवादी असल्याचे विधान केले होते. या विधानाचा भाजप-शिवसेनेकडून कडाडून निषेध केला गेला. तर या विधानामुळे कमल हासन यांच्यावर मदुराईत मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर "ते भाषण केवळ नथुराम गोडसे यांच्याविरुद्ध होते, सर्व हिंदूंच्या विरोधात नव्हते," असे स्पष्टीकरण कमल हासन यांच्याकडून देण्यात आले.