Kalyan Singh Dies: कल्याण सिंह यांच्या निधनाने राजकरणात शोककळा; पीएम मोदी, राजनाथ सिंह यांच्यासह 'या' दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे आज वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे.

Kalyan Singh Dies: कल्याण सिंह यांच्या निधनाने राजकरणात शोककळा; पीएम मोदी, राजनाथ सिंह यांच्यासह 'या' दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली
कल्याण सिंह (Photo Credits: ANI)

Kalyan Singh Dies: उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे आज वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना 4 जुलै रोजी गंभीर अवस्थेत उपचारासाठी संजय गांधी स्नातकोत्तर आयुर्विज्ञान संस्थेत भर्ती करण्यात आले होते. दीर्घकाळ आजारपण आणि शरिरातील अवयव सुद्धा हळूहळू कमकूवत होऊ लागले होते. अखेर आज त्यांचा मृत्यू झाला आहे.

युपीच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाने संपूर्ण राजकरणात शोककळा परसरली आहे, देशातील बहुतांश राजकीय नेत्यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी असे म्हटले की, कल्याण सिंह यांनी समाजापासून वंचित राहिलेल्या बहुसंख्य लोकांना आवाज दिला आहे. त्यांनी शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सशक्तीकरणाला दिशा दाखवण्यासाठी खुप प्रयत्न सुद्धा केले.(Kalyan Singh Passes Away: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन)

-पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)

-अखिलेश यादव (Akhilesh Yadav):

उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी असे म्हटले की, उत्तर प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री, राजस्थानचे माजी राज्यपाल श्री कल्याण सिंह यांचे निधन हृदय पिळवटून टाकणारे आहे. त्यांच्या आत्माला शांती मिळो. त्यांच्या परिवाराच्या दु:खात सामील असल्याचे अखिलेश यादव यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.

मायावती (Mayawati):

राजनाथ सिंह (Rajnath Singh):

शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan):

मध्य प्रदेशातील सध्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा या घटनेवर दुख व्यक्त केले आहे, दरम्यान, कल्याण सिंह यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1931 मध्ये उत्तर प्रदेशातील अलीगढ येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव श्री तेजपाल लोधी आणि आईचे नाव श्रीमती सीता देवी असे होते. कल्याण सिंह हे दोन वेळा  उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि अतरौलीच्या विधानसभेचे सदस्य होते. तसेच बुलंदशहर आणि एटा येथील लोकसभेचे सदस्य असण्यासह राजस्थान आणि हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल होते.

(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2021 11:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).