जे. पी नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष; निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांची घोषणा

भारतीय जनता पक्षाचे (BJP) कार्यकारी अध्यक्ष जे. पी नड्डा (J.P Nadda) यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी (National President of Bharatiya Janata Party) बिनविरोध निवड झाल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह (RadhaMohan Singh) यांनीच ही घोषणा केली आहे. भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांची मोदी सरकार मध्ये केंद्रीय गृहमंत्री म्हणून जबाबदारी पडल्यानंतर भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड होणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता. तसेच भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी नव्या व्यक्तीकडे द्यावी, अशी विनंती अमित शाह यांनी केली होती. भाजपा पक्षामधील ' एक व्यक्ती एक पद' या धोरणानुसार आता अमित शाह यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 5 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी आता जे. पी नड्डा यांच्या खांद्यावर सोपण्यावर आली आहे.

राज्यसभेचे सदस्स असलेले जे.पी नड्डा भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च बोर्डाचे सचिवदेखील आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचा कार्यकाळ जानेवारी 2019 मध्ये पूर्ण झाले आहे. परंतु, विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन अध्यक्षपदाची निवडणूक टाळली गेली. अमित शाह केंद्रीय गृहमंत्री बनल्यामुळे जे पी नड्डा यांना जून महिन्यात कार्यकारी अध्यक्ष बनवले गेले. भाजपचे 2014 साली सरकार बनल्यानंतर जेपी नड्डा यांच्यावर आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. हे देखील वाचा- काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक

एएनआयचे ट्वीट-

भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह यांना नड्डांचे नाव सुचवले होते. यामुळे नड्डा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, असे सांगण्यात येत होते.