फारूक अब्दुल्ला (Photo Credit: PTI/File)

जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. मात्र या निर्णयाचा विरोध करण्यात आला. याच पार्श्वभुमीवर जम्मू-कश्मीर मधून कलम 370 हटवल्यानंतर 5 ऑगस्ट पासून नजरकैदेत होते. परंतु आता फारूक अब्दुल्ला (Dr. Farooq Abdullah) यांच्यावरील नजरकैद संपवण्याचे आदेश जम्मू-कश्मीरच्या सरकारने निर्णय घेतला आहे. फारूक हे जवळजवळ 7 महिन्यानंतर सराकरने त्यांच्यावरील नजरकैद हटवण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी आठ विरोधी पक्षांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडे अशी मागणी केली होती की, कश्मीर येथील नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या नेत्यांची लवकरच सुटका करावी. यामध्ये माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांची नावे होती.

केंद्रातील सरकारने जम्मू-कश्मीर मधून कलम 370 रद्द केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळेच तेथे कलम 144 लागू करण्यात आला होता. त्यावेळीच उमर अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तर एएनआय यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-कश्मीर मधील सरकारने फारूक अब्दुल्ला यांच्यावरील नजरकैद संपवण्याचे आदेश दिले आहेत.(मध्य प्रदेश मध्ये 'कमलनाथ सरकार' धोक्यात; 6 बंडखोर मंत्र्यांना हटवले एकूण 19 आमदारांनी पाठवला राजीनामा)

दरम्यान, फारूक अब्दुल्ला यांना 5 ऑगस्टला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र गेल्या वर्षात 15 सप्टेंबरला पब्लिक सेफ्टी अॅक्ट अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी तीन महिन्यांसाठी नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तीन महिन्यांची नजरकैद ही 15 डिसेंबरला संपणार होती. मात्र त्याच्या दोन दिवस आधी 13 डिसेंबरला त्यांच्या नजरकैदेत 3 महिन्यांची वाढ करण्यात आली. पण आता फारूक अब्दुल्ला यांच्यावरील नजरकैद रद्द करण्यात यावी असा निर्णय घेतला आहे.