Nana Patole (Photo Credit: Twitter)
भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईत शिवाजी पार्कवर (Shivaji Park, Dadar) अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अंत्यदर्शन घेण्यासाठी काल शिवाजी पार्कवर आले होते. तसेच राजकारणातील दिग्गज नेते पण उपस्थित होते, नंतर काल सायंकाळी सातच्या सुमारास लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. दरम्यान शिवाजी पार्कमध्ये भारतरत्न लतादीदींचे स्मारक दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे, अशी मागणी भाजप पाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. या आधी भाजप आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. आता शिवाजी पार्कमध्ये लतादीदींचे स्मारक व्हावे, अशी मागणीही काँग्रेसने पण केली केली आहे.
काँग्रेसचे मोठे नेते अनुपस्थित, पटोलेंनी सांगितलं कारण
नाना पटोले म्हणाले की, काल बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अमित देशमुख या सर्वांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे ते काल लतादीदींच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नाहीत. मी तिथे होतो कारण माझ्या बहिणीच्या सासूबाईंचे निधन झाले होते, आमचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप तिथे होते. सध्या महाराष्ट्रात आम्ही तालुक्यातील काँग्रेस कमिटीच्या लोकांना सूचना दिल्या आहेत. काल सर्वत्र लतादीदींना श्रद्धांजली वाहण्याचे काम सुरू आहे. वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हेही मुंबईबाहेर होते. शनिवार आणि रविवारी भरपूर प्रवास केला. अनेकांना कनेक्टिव्हिटी नव्हती. त्यामुळेच आम्ही पोहोचू शकलो नाही, असे नाना पटोले म्हणाले. नाना पटोले म्हणाले की, लतादीदी काँग्रेस घराण्यातील होत्या. काँग्रेसने भारतरत्न दिला म्हणून नाही तर त्यांचे योगदान मोठे आहे. आता मी लतादीदींच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणार आहे. (हे ही वाचा
Sanjay Raut On Shah Rukh Khan Trollers: शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना संजय राऊतांचे चोख प्रत्यूत्तर, म्हणाले अशा वेळी ट्रोल करायला लाज वाटत नाही ?)
शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यानां दिल उत्तर
शाहरुख खानबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले की, संविधानानुसार प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार वागायला मोकळीक आहे. काही लोक मुद्दाम टीका करून धर्माला मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणाले की, काही लोकांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला आहे इतरांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग करण्याचा ठेका घेतला आहे. तसेच धर्मावर टीका करुन विषय वाढवण्याचं काम करत आहे.