Indira Gandhi Birth Anniversary: भारताच्या Iron Lady इंदिरा गांधींबद्दल काही खास गोष्टी!
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी (Photo Credit-PTI)

Indira Gandhi 101st Birth Anniversary: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आज जन्मदिवस. इंदिरा गांधी (Indira Gandhi) आपल्या निर्णयांसाठी ओळखल्या जातात. भारताच्या राजकीय इतिहासात इंदिरा गांधींकडे अत्यंत खंबीरपणे नेतृत्व करणाऱ्या राजकर्त्या म्हणून पाहिले जाते. पाकिस्तानला युद्धात पराभूत करण्यात आणि बांग्लादेशची निर्मिती करण्यात त्यांचे असलेले महत्त्वाचे योगदान संपूर्ण जगाला परिचित आहे. इंदिरा गांधींनी त्यांच्या राज्यात फक्त राजकीयच नाही तर सामाजिक परिवर्तनं देखील केली. तर जाणून घेऊया इंदिरा गांधींच्या जीवनाबद्दलच्या काही खास गोष्टी...

# इंदिरा गांधींचे पूर्ण नाव इंदिरा प्रियदर्शनी गांधी होते. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1971 मध्ये उत्तर प्रदेशातील इलाहाबाद येथे एका सुखवस्तू परिवारात झाला. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु इंदिरा गांधींचे वडिल होते आणि मोतीलाल नेहरु हे त्यांचे आजोबा होते.

# इंदिरा गांधी जेव्हा 12 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांनी मुला-मुलींची एक सेना बनवली होती. त्या सेनेचे नाव 'वानरसेना' ठेवले होते.

# इंदिरा गांधी यांनी सोमरविल कॉलेज आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले होते. 1941 मध्ये भारतात परत आल्यानंतर त्यांनी भारतीय स्वतंत्रता आंदोलनात सहभाग घेतला.

# 'भारत छोडो' आंदोलना अंतर्गत त्यांनी 1942 मध्ये तुरुंगवासही भोगला. त्याचदरम्यान इंदिरा गांधींनी 26 मार्च, 1942 मध्ये फिरोज गांधींशी लग्न केले आणि त्यांचे नाव इंदिरा गांधी झाले.

# 1958 मध्ये काँग्रेस संसदीय बोर्डच्या सदस्या म्हणून त्यांची निवड झाली आणि फेब्रुवारी 1959 मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या.

# इंदिरा गांधींना दोन मुले झाली. एक राजीव गांधी तर दुसरे संजय गांधी.

# सर्वात प्रथम इंदिरा गांधींनी लालबहादूर शास्त्रींच्या मंत्रीमंडळात 1964-1966 पर्यंत सूचना आणि प्रसारण मंत्रीपदाची धुरा सांभाळली.

# इंदिरा गांधींच्या काळात 26 जून 1975 मध्ये भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती. 1969 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी देशाच्या 14 खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. तेव्हा या बँकांकडे देशातील 70% जमापूंजी होती.

# 'ऑपरेशन ब्लूस्टार' हे इंदिरा गांधींच्या हिंमतीचे आणि ध्येर्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. या ऑपरेशन अंतर्गत आंतगवादाचा सामना करण्यात आला. इंदिरा गांधींच्या या निर्णयामुळे अनेक शिख त्यांचे शत्रू झाले. त्यानंतरही त्यांनी शिख बांधवांशी वैर पत्करले नाही किंवा भय बाळगले नाही.

# ऑपरेशन ब्लूस्टारनंतर देखील त्यांनी आपल्या अंगरक्षकांच्या समूहात दोन शिख बांधवांची नेमणूक केली आणि तेच त्यांच्या अंताचे कारण ठरले. दोन्ही शिख अंगरक्षकांनी बेअंत सिंग आणि सतवंत सिंग यांनी त्यांची गोळी झाडून हत्या केली.