राज्य सरकारने (Maharashtra Govt) अलीकडेच किराणा दुकाने आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली, ज्यावर विरोधकांनी टीका केली आहे. आता यामध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज (MIM MP Imtiaz Jalil) जलील यांनी आक्रमक पवित्रा घेत किराणा दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये सुरू होणारी वाईनची दुकाने फोडण्याचे संकेत दिले आहेत. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलताना जलील म्हणाले, सरकारने वाईनचे दुकान उघडावे, आम्ही ते फोडुन काढू, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. कारण सरकार समाजात नवीन धोरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, आणि आम्ही ते होवु देणार नाही. तसेच फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे घडत असेल तर यापेक्षा वाईट काय असू शकते. त्यामुळे आम्ही ते सहन करणार नाही. म्हणून जर तुम्ही वाईन दुकानात विकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही दुकान फोडणयाचा निर्णय घेतला आहे, असे जलील म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतालाय, असं समर्थन सरकारच्या वतीने करण्यात येतंय. मग चरस आणि गांजाही शेतातच येतात. त्यालाची परवानगी द्या, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार जलील यांनी व्यक्त केली. जलील यांनी सरकारच्या या वाईन धोरणाविरोधात लढा देण्यास महिला वर्गालाही आवाहन केले आहे. आया बहिणींनी पुढे येऊन ही वाईनची दुकानं फोडली पाहिजेत, असेही खासदार जलील म्हणाले. भाजप, काँग्रेस या निर्णयाविरोधात फक्त निंदा करतायत, मात्र आम्ही कृती करू. असेही जलील म्हणाले. (हे ही वाचा Mumabi: मालाड येथील गार्डनचे अधिकृत नाव टिपू सुल्तान नसून त्या संदर्भात महापालिकेकडे रजिस्ट्रेशन सुद्धा नाही- किशोरी पेडणेकर)
राज्य सरकारला थेट इशारा
यावेळी बोलताना जलील म्हणाले, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याच्या ठाकरे सरकारला माझा थेट इशारा आहे की, तुम्ही औरंगाबादेत येऊन दारूच्या दुकानाचे उद्घाटन केले तर मी स्वतः फोडेल असा “जलील यांनी थेट इशारा दिला आहे. तसेच तुम्ही माझ्यावर आरोप देखील करू इच्छिता, पण आम्ही मागे हटणार नाही.