Exit Polls 2022 | PC: File Image

182 विधानसभा जागांसाठी पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणूकांचा निकाल (Gujarat Election Result) 8 डिसेंबर दिवशी जाहीर केला जाणार आहे. पण तत्पूर्वी आज या निवडणूकीचे एक्झिट पोलचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. विविध संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणांनंतर आज हळूहळू अंदाज जाहीर केले जात आहे. गुजरात मध्ये दुसर्‍या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर 6.30 नंतर हे एक्झिट पोल (Exit Poll) अंदाज जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान एक्झिट पोल अंदाजांनुसार, गुजरात मध्ये भाजपा (BJP) आपली सत्ता पुन्हा कायम ठेवण्यासाठी यशस्वी ठरणार असल्याचं चिन्हं आहे.

गुजरात मध्ये मागील 25 वर्षांपासून भाजपा सत्तेमध्ये आहे. 2017 मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपाकडे 99, कॉंग्रेस कडे 77, अपक्ष 3, एनसीपी 1, भारतीय ट्रायबल पार्टी 2 असं संख्याबळ होते. नक्की वाचा: HP Exit Poll Result 2022: हिमाचल प्रदेश मध्ये कॉंग्रेस-भाजपा मध्ये पहायला मिळू शकते कॉंटे की टक्कर; पहा एक्झिट पोल अंदाज .

पहा एक्झिट पोलचे निकाल

Republic-PMARQ and TV9 Gujarati च्य अंदाजानुसार भाजपा पहिल्या स्थानी तर कॉंग्रेस दुसर्‍या स्थानी असेल. आम आदमी पक्षाचा या राज्यात फार प्रभाव नसेल. रिपब्लिक-पीएमएआरक्यू एक्झिट पोलच्या निकालानुसार भाजप १२८-१४८, काँग्रेसला ३०-४२ आणि आप ०-३ जागा जिंकू शकतात. TV9 गुजराती च्या एक्झिट पोलच्या निकालांनुसार, भाजपला 125-130 जागा, काँग्रेसला 40-50 आणि AAP 3-5 जागा जिंकण्याची शक्यता आहे. आहे.जन की बात यांच्या एक्झिट पोलनुसार 182 जागांपैकी भाजपला 129 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

ABP-CVoter च्या एक्झिट पोलच्या निकालानुसार, गुजरात विधानसभेत भाजपला 128 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज आहे. AAP 3 ते 11 जागा जिंकण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 31 ते 43 जागा मिळू शकतात.

भाजपला आजतागायत विधानसभा निवडणूकीमध्ये सर्वाधिक 127 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजप यापेक्षा अधिक जागा मिळवेल, अशी शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.  यंदा गुजरात मध्ये आप, कॉंग्रेस आणि भाजपा अशा तीन पक्षांमध्ये लढाई पहायला मिळाली आहे.