Year Ender 2018 : सन 2018 संपत असून 2019 हे वर्ष पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहे. विविध क्षेत्रांसाठी 2018 हे वर्ष अनेक कारणांसाठी महत्त्वाचे ठरले. याला राजकीय क्षेत्रही अपवाद नाही. विविध कारणांसाठी राजकीय क्षेत्र 2018 मध्ये चर्चेत असले तरी, प्रामुख्याने राजकीय नेत्यांनी वेळोवेळी केलेली वादग्रस्त विधानं ही या वर्षी चर्चेचे खास कारण ठरली. भाजप असो किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, बसपा असो की इतर कोणताही राजकीय पक्ष. मग तो प्रादेशिक असो की, राष्ट्रीय सर्वच राजकीय पक्षांच्या कोणा ना कोणा नेत्याने वादग्रस्त विधान हे केलेलेच आहे. मागे वळून पाहताना 2018 मध्ये राजकीय नेत्यांनी उधळलेली ही मुक्ताफळे पाहून आपल्याला आश्चर्य मुळीच वाटणार नाही.
शरद यादव
शरद यादव हे बिहारमधी एक ज्यष्ठ राजकीय नेते आहेत. राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे (Vasundhara Raje)यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना त्यांनी वसुंधरा राजे यांना त्या बऱ्याच जाड झाल्या असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे म्हटले होते. त्यांच्या विधानावरुन जोरदार टीका झाली होती. नंतर त्यांनी माफीही मागितली.
काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राहुल यांच्या पिढीबाबत संपूर्ण जगाला माहिती आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडीलांबाबत कोणालाच माहिती नाही. असे असूनही ते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांच्याकडून हिशोब मागतात, असे विधान केले होते. मुत्तेमवार यांनी केले होते.
राज बब्बर
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान कॉग्रेस नेते राज बब्बर (Raj Babbar)यांनी वादग्रस्त विधान केले होते. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्याची टीका करताना राज बब्बर यांनी या घरणीची तुलना पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या वयाशी केली होती.
शशी थरुर
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी 'द पॅराडॉक्सिकल प्राइम मिनिस्टर' या पुस्तकाबाबत बोलताना आरएसएस (RSS)च्या एका व्यक्तिसोबत झालेला संवाद सांगितला होता. त्या व्यक्तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना 'महादेवाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाशी' केल्याची आठवण थरुर यांनी सांगितली होती. तसेच, या विंचवाला हाताने उचलता येत नाही तसेच, चप्पलनेही मारता येत नसल्याचे म्हटले होते.
अश्विनी कुमार चौबे
बक्सरचे खासदार अश्विनी कुमार चौबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी राहुल गांधी यांना 'घाणेरड्या गटारातील किडा' अशी उपमा वापरली होती.
सुरेंद्र सिंह
उत्तर प्रदेश येथील बैरिया मतदारसंघातील भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी अधिराऱ्यांची तुलना वेश्यांसोबत केली होती. अधिकाऱ्यांपेक्षाही वेश्यांचे चरित्र चांगले असते असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले होते.
राधा मोहन सिंह, केंद्रीय कृषीमंत्री
केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंह यांनी शोतकरी आंदोलनाबाबत अत्यांत वादग्रस्त विधान केले होते. शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया देताना शेतकऱ्यांचे आंदोलन म्हणजे केवळ मीडियासमोर येण्यासाठी केलेला काम अशी संभावना सिंह यांनी केली होती.
अनिल विज
अनिल विज हे हरियाणाचे आरोग्यमंत्री आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना निपाह व्हायरससोबत केली होती. (हेही वाचा, #GoodBy2018: सन 2018 मध्ये सोशल मीडियावर टॉप ट्रेंड ठरलेले हॅशटॅग)
नरेश अगरवाल
एकेकाळी मुलायमसिंह यांच्या अत्यंत जवळचे असलेले नेते नरेश अगरवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री जया बच्चन यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. जया बच्चन यांचा उल्लेख त्यांनी चित्रपटात नाचणारी असा केला होता. नाचणाऱ्या महिलेचे ऐकल्यानेच समाजवादी पक्षाने आपले तिकीट कापल्याचा आरोप त्यांनी केला होता.
विप्लव देव
विप्लव देव हे त्रिपूराचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनीही या वर्षात अनेक विधाने केली आहेत. ज्यामुळे ते सतत चर्चेत राहिले.