Sushma Swaraj Last Rites (Photo Credits-ANI Twitter)

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या, माजी परराष्ट्र मंत्री, अजातशत्रू व्यक्तिमत्त्व सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांच्या आज (7 ऑगस्ट) लोधी रोड येथील शवागृहात अंतिम संस्कार करण्यात आले. काल रात्री एम्समध्ये कार्डिएक अरेस्टच्या झटक्याने सुषमा स्वराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले होते. त्यानंतर भाजपा कार्यालयात ठेवले. पुढे 3 च्या सुमारास त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली.सुषमा स्वराज यांना कार्डिएक अरेस्टचा झटका आल्यानंतर रात्री दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सुषमा स्वराज यांना वाचवण्यसाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली पण अखेर उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि 10.50 pm च्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आलं. सुषमा स्वराज ठरल्या Cardiac Arrest च्या बळी; हार्ट अटॅक पेक्षा गंभीर असलेला हा आजार नेमका आहे काय?

सुषमा स्वराज यांच्यावर शासकीय इतमाममध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. दरम्यान शेवटचे विधी हे सुषमा स्वराज यांच्या मुलीने केले असून पती स्वराज कौशल आणि मुलगी बांसुरी कौशल यांनी साश्रू नयनांनी सुषमा स्वराज यांना अखेरचा निरोप दिला.  सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर दिल्लीमध्ये 2 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यानुसार सारे मनोरंजक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.  Sushma Swaraj Love Story: कुटुंबियांचा विरोध तरीही सुषमा स्वराज यांनी स्वराज कौशल यांच्याशी बांधली लग्नगाठ

सुषमा स्वराज यांच्यावर अंतिम संस्कार करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा उपस्थित होते. सोबतच भाजपाचे अनेक दिग्गाज नेत्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. सुषमा स्वराज यांच्या राहत्या घरी पार्थिव दर्शनासाठी नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शहा यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळेस कुटुंबीयांचे सांत्वन करताना मोदींसह लालकृष्ण अडवाणीच्या डोळ्यात अश्रू तरळले.