Close
Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 15, 2024
ताज्या बातम्या
6 hours ago

Exit Poll Results of Punjab Assembly Elections 2022 Live Updates: पंजाब मध्ये AAP ला सर्वाधिक 39.1% मतं; ABP-C Voters चा अंदाज

राजकीय टीम लेटेस्टली | Mar 07, 2022 07:53 PM IST
A+
A-
07 Mar, 19:52 (IST)

पंजाब मध्ये AAP ला सर्वाधिक 39.1% मतं मिळाल्याचा  ABP-C Voters चा अंदाज आहे. त्या पाठोपाठ कॉंग्रेस मध्ये 26.7%, तर अकाली दलाला 20.7% मतांचा अंदाज आहे.  

07 Mar, 19:31 (IST)

टाईम्स नाऊ च्या अंदाजानुसार पंजाबमध्ये आप कडे सर्वाधिक 70 तर कॉंग्रेस कडे 22 जागा मिळतील असा अंदाज आहे.  

07 Mar, 19:21 (IST)

ABP-C Voters च्या अंदाजानुसार पंजाब मध्ये आम आदमी पार्टीला 51-61 जागा मिळण्याची शक्यता  आहे.

07 Mar, 19:15 (IST)

पंजाब मध्ये आप ला सर्वाधिक 100 तर कॉंग्रेसला 10 आणि भाजपाला 1 जागा मिळेल असा टुडेज चाणाक्य चा अंंदाज आहे.

07 Mar, 19:14 (IST)

पंजाब मध्ये आप ला सर्वाधिक 100 तर कॉंग्रेसला 10 आणि भाजपाला 1 जागा मिळेल असा टुडेज चाणाक्य चा अंंदाज आहे.

07 Mar, 19:01 (IST)

पंजाब मध्ये आप कडे सत्तेच्या चाव्या असतील असा Axis My India  चा अंदाज आहे. त्यांच्या माहितीनुसार आपला  76-90 जागा मिळू शकतात. 

पंजाब (Punjab) मध्ये 20 फेब्रुवारी दिवशी विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणूकीचा निकाल 10 मार्च दिवशी जाहीर होणार असला तरीही आज संध्याकाळी जाहीर होणार्‍या एक्झिट पोल कडे अनेकांच्या नजरा आहेत. 117 विधानसभा जागांवर या निवडणूका पार पडल्या आहेत. त्यामध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आहे. आज संध्याकाळी 7 वाजता जाहीर होणार्‍या एक्झिट पोल (Exit Poll) निकालांमध्ये त्याचा अंदाज येणार आहे. पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी भाजपा सोबत हातमिळवणी करत विधानसभा निवडणूक लढली आहे. तर भाजपाचा एकेकाळचा साथीदार अकाली दल यंदा  बीएसपी सोबत निवडणूकीच्या रिंगणात उतरला होता.

पंजाब मध्ये 2017 साली झालेल्या निवडणूकांमध्ये मात्र एक्झिट पोल खोटे ठरले होते. पंजाब मध्ये मागील विधानसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेस ला सरकार स्थापन करण्यामध्ये यश आलं होतं. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आप आणि कॉंग्रेसमध्ये कांटे की टक्कर होणार असल्याचा अंदाज होता. पण तो खोटा ठरवत कॉंग्रेस सरकार स्थापन करण्यामध्ये यशस्वी ठरली होती.

10 मार्च दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून उत्तर प्रदेश, उत्‍तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुर विधानसभा निवडणूकीचा निकाल जाहीर होणार आहे.


Show Full Article Share Now