भाजपचे उमेदवार सनी देओल यांनी पठाणकोट येथे जाहीर प्रचाराची मुदत संपल्यानंतरच्या काळातही सभा घेतल्याप्रकरणी सनी देओल यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. ह्या सभेत मोठ्या आवाजाचे ध्वनिवर्धकही वापरले असल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे. एकूण दोनशे लोक या सभेस उपस्थित होते.
मतदानाच्या 48 तासांआधी सर्व उमेदवारांनी प्रचार बंद करणे बंधनकारक असते. पण असे असतानाही भाजप उमेदवार सनी देओल यांनी पठाणकोट येथे आचारसंहितेचा भंग करुन प्रचार सभा घेतली. तसेच त्याच मोठ्या आवाजाची ध्वनिवर्धकही वापरली. म्हणूनच त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.
ह्याआधी ही फेसबुकवर 'फॅन्स ऑफ सनी देओल' हे पान सुरु करुन त्याचा खर्च सनी देओल यांच्या नावावर निवडणूक खर्च म्हणून लावण्यात आला होता. निवडणूक खर्चात या पानाचे 1,74,644 रुपये धरण्यात आले होते. त्यासंबंधी काँग्रेसचे पदाधिकारी हिमांशू पाठक यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र सनी देओल यांनी निर्धारित वेळेत ह्याचे उत्तर न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. फेसबुकवर 30 एप्रिल रोजी हे पेज सुरु करुन त्यावर मोठा खर्च करण्यात आला होता.
सनी देओल हे गुरुदासरपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांच्यात चुरशीची लढत होणार का आणि येथील मतदार कोणाला कौल देणार हे येत्या 23 मे रोजी कळेलच.