Loksabha Elections 2019: नुकताच भाजप पक्षात प्रवेश केलेल्या बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी पंजाबमधील गुरदासपूर येथून दाखल केला उमेदवारी अर्ज
Sunny Deol (Photo Credits: Twitter)

लोकसभा निवडणूक 2019 (Loksabha Elections 2019) साठी नुकत्याच भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या अभिनेता सनी देओल (Sunny Deol) यांनी पंजाब (Punjab) मधील गुरदासपुर (Gurdaspur) येथून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या महत्त्वाच्या प्रसंगी सनी देओल यांच्या  सोबत भाऊ आणि अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) देखील उपस्थित होता. या प्रसंगाचे काही फोटोज समोर आले आहेत. एएनआयने ट्विट करत याची माहिती दिली. (अभिनेता सनी देओल यांनी केला भाजप प्रवेश)

ANI ट्विट:

सनी देओल आता भाजपकडून गुरदासपूर, पंजाब येथून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर हेमा मालिनी भाजपकडूनच मथुरा येथील निवडणूक लढवणार आहेत.

ANI ट्विट:

अलिकडेच लोकसभा निवडणूक 2019 साठी भाजप पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली. यात बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरदासपूर, किरण खेर चंढीगड तर सोमप्रकाश हे पंजाबमधील होशियार येथून निवडणूक लढवणार आहेत.