नवी दिल्ली: लोकसभेचे (Loksabha Elections) शिवधनुष्य आपल्या खांदयावर पेलवणाऱ्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजावर राहुल गांधींनी (Rahul Gandhi) प्रश्न उभा केला आहे. निवडणूक आयोगाचे काम स्वतंत्र पणे व्हावे असे अपेक्षित असताना सध्या आयोग भाजपाच्या (BJP) प्रती मवाळ भूमिका स्वीकारत पक्षपात करताना दिसत आहे असे मत राहुल यांनी मांडले. नवी दिल्ली येथील काँग्रेसच्या मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना काँग्रेस अध्यक्षांनी भाजपा व निवडणूक आयोगावर असा हल्लाबोल केला. मागील अनेक दिवसांपासून विरोधकांच्या बाबत निवडणूक आयोग नेहमी कठोर भूमिका घेते मात्र सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधी कारवाई करण्यात नेमकं आयोग कच खातं असा आरोप विरोधक पक्षांकडून करण्यात येत होता.
टाइम्सच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर त्यांनी अनेक स्वतंत्र सरकारी संस्थांचे स्वायत्त मोडीत काढून स्वतःची मनमानी करायला सुरवात केली आहे, अशा वेळी निदान निवडणूक आयोगाने तरी पक्षपात करू नये अशी अपेक्षा होती, मात्र तसे घडताना दिसत नाही. निवडणूक आयोगाने भाजपाला कितीही मदत केली तरी जनता मोदींना व भाजपाला पुन्हा निवडुन देणार नाही असा विश्वास राहुल गांधीनी परिषदेत व्यक्त केला. Loksabha Elections 2019 : नरेंद्र मोदींची प्रतिमा हीच त्यांची ताकद आणि मी ती मलिन करेनच: राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करणे अशक्य असल्याची चर्चा पाच वर्षांपूर्वी सुरू होती. मात्र, काँग्रेसने हा समज चुकीचा ठरवला आहे. मोदींना काँग्रेसने उद्ध्वस्त केले असून आज तुमच्यापुढे जे दिसतेय, तो केवळ पोकळ सांगाडा आहे. आणखी 15-20 दिवसांत तोही कोसळणार असल्याचे देखील गांधी यांनी सांगितले.
ANI ट्विट
Congress President Rahul Gandhi: Five years ago, it was said that Modi ji will rule for 10-15 years, that he is invincible. Congress party has demolished Narendra Modi ji, it is a hollow structure and in 10- 20 days, it will come crumbling down. pic.twitter.com/9b0xVIJOMq
— ANI (@ANI) May 4, 2019
यावतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष यांनी बेरोजगारीचा वाढता दर, लष्कराच्या कामगिरीवर करण्यात येणाऱ्या राजकारण, मध्यमवर्गीयांच्या समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार, राफेल बाबत चौकशी या सर्व मुद्द्यांवर देखील परिषदेत भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांशी भ्रष्टाचार व रोजगाराच्या प्रश्नांवर निदान दहा मिनिट तरी वादविवाद करून दाखववव असे आवाहन देखील राहुल गांधी यांनी या प्रसंगी केले.