लोकसभा निवडणूकीत (Lok Sabha Election) एनडीएच्या (NDA) सरकारचे बहुमताने विजय झाला. तसेच नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी शपथ घेतली. त्यानंतर आज संसदीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्यावेळीसुद्धा नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत खासदार म्हणून आज (17 जून) शपथ घेतली.
तर संसदीय बोर्डाने जे.पी. नड्डा ( JP Nadda) यांना भाजप पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड केली आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नड्डा यांना उत्तर प्रदेशाची कमान सोपवण्यात आली होती. त्यानंतर नड्डा यांनी उत्तमगिरी करत त्यांना दिलेली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली. उत्तर प्रदेशात नड्डा यांना लोकसभा निवडणुकीत 64 जागांवर विजय मिळवता आला. तर आता यंदाच्या निवडणुकीतील घवघवीत यशानंतर अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Delhi: Senior BJP leaders present bouquets to JP Nadda at the BJP Parliamentary Board meeting being held at the BJP headquarters. pic.twitter.com/sgvmAx2tym
— ANI (@ANI) June 17, 2019
जे. पी. नड्डा हे हिमाचल प्रदेशातून राज्यसभा खासदार आहेत. तसेच 2014 रोजी भाजपची सत्ता प्रथमच आल्यानंतर त्यांना आरोग्यमंत्री पद देण्यात आले होते. त्याचसोबत हिमाचल प्रदेशातील विद्यापीठातून नड्डा यांनी LLB ची पदवी संपादित केली आहे.