Monsoon Session 2019:17 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून; नरेंद्र मोदी यांच्यासह खासदारांच्या शपथविधीला सुरूवात
Narendra Modi (Photo Credits: Twitter)

17th Lok Sabha Session: लोकसभा निवडणूकीनंतर आज नवनिर्वाचित खासदारांचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. ही स्वतंत्र भारतामधील 17 वी लोकसभा आहे. दिल्लीमध्ये आज नव्या सरकारच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वीरेंद्र कुमार (Virendra Kumar) यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष (Protem Speaker)म्हणून शपथ दिल्यानंतर उर्वरित खासदारांच्या शपथविधीला सुरूवात झाली आहे.

ANI Tweet

नरेंद्र मोदी यांचा शपथविधी

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात 30 मे दिवशी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता खासदार म्हणून नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत शपथ घेतली आहे. आज निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी पार पडणार आहे. त्याची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून झाली आहे. शिवसेनेचे खासदार मराठी भाषेतून शपथ घेणार आहेत.

17 व्या लोकसभेत प्रवेश करण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी निवडणूकीत एनडीएला दिलेल्या भरघोस मतांबाबत मतदारांचे आभार मानले. आगामी पाच वर्षात देशहिताचे निर्णय होतील अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.