गरीब कल्याण योजनेअंतर्गत खरच गरजूंच्या खात्यात 500 रुपये जमा केले जातायत, प्रियंका चर्तुर्वेदी यांचा निर्मला सीतारमण यांना सवाल
Priyanka Chaturvedi - Nirmala Sitharaman (Photo Credits: PTI)

मोदी सरकारने (Modi Government) मासिक आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्या महिलांचे जनधन योजने (JanDhan Yojana) अंतर्गत खाते आहे त्यांच्या खात्यात 500 रुपये सध्याच्या लॉकडाउनच्या काळात जमा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या संदर्भातील व्हिडिओ दूरदर्शन यांनी सुद्धा झळकावला होता. त्यामध्ये एका महिलेना जन धन योजनेअंतर्गत तिच्या खात्यात 500 रुपये जमा झाल्याने तिने म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला 32 कोटींपेक्षा अधिक जणांना गरिब कल्याण योजनेअंतर्गत 29,352 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

डीडी नॅशनल यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत, एक महिला तिला मोदी सरकारने मदत केल्याचे म्हणत आहे. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात पंतप्रधान आम्हाला खुप मदत करत असल्याचे ही महिलेने म्हटले आहे. फुकटात कुटुंबांना राशन पुरवले जात आहे. सध्या कोणाकडे ही नोकरी नाही आहे मात्र जन धन योजनेअंतर्गत 500 रुपये खात्यात जमा करण्यात आले आहेत. यासाठी मला पंतप्रधानांचे आभार मानायचे आहेत. अशा सर्व गोष्टी महिलेने व्हिडिओतून स्पष्ट केल्या आहेत. हा व्हिडिओ महिलेच्या घराबाहेरील आहे. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ सुद्धा दूरदर्शन यांनी शेअर केले आहेत. काही महिलांनी आम्ही आर्थिक दृष्टा स्थिर असल्याचे ही म्हटले आहे.

या व्हिडिओवर शिवसेनेच्या राज्यसेभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना प्रश्न विचारला आहे. त्यानुसार खरंच गरजू लोकांच्या खात्यात ही रक्कम जमा केली जात आहे का असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र अशी आशा आहे की, संकटाच्या काळात चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम न जाता गरजूंच्या खात्यात असावी. असे प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे.(गृह मंत्रालयाकडून लॉकडाउनसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर, 'या' कामांसाठी मिळणार परवानगी)

Priyanka Chaturvedi's Tweet:

मात्र ट्वीटवर आता व्हिडिओतील महिलेला खरच पैशांची गरज आहे का असा ही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

काहींनी असे म्हटले आहे की, ती भाजप पक्षाचे समर्थन करणारी असून तिच्या घरावर मोदी यांचे फोटो सुद्धा चिटकवण्यात आले आहेत.

निर्मला सीतारमण यांनी 1,70,000 कोटी रुपयांचे रिलीफ पॅकेजची घोषणा केली असून लॉकडाउनच्या काळात समस्यांचा सामना करत आहेत त्यांसाठी त्याचा उपयोग करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना 2 हजार आणि जन धन खात्याअंतर्गत महिलांना 500 रुपये दिले जाणार आहेत.