Congress: महागाई विरोधात कॉंग्रेसचा एल्गार, दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली काढत भाजप सरकार विरुध्द हल्लाबोल
Congress flags | Representational Image | (Photo Credits: PTI)

काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल (Congress Leader K C Venugopal) यांनी शनिवारी (Saturday) पत्रकार परिषद (Press Conference) घेतली. दरम्यान देशातील महागाईविरोधात (Inflation In India) कॉंग्रेस (Congress) रविवारी म्हणजेचं आज ‘मेहंगाई पर हल्ला बोल’ ही मेगा रॅली (Mega Rally) काढणार आहे. दिल्लीच्या (Delhi) रामलीला मैदानात (Ram Leela Ground) ही रॅली (Rally) होणार असून पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भाषणाने (Speech) या रॅलीस सुरुवात होईल अशा माहिती केसी वेणुगोपाल (K C Venugopal) यांनी दिली आहे. सरचिटणीस आणि पक्ष प्रभारींसह काँग्रेसचे वरिष्ठ नेते सकाळी 11 च्या सुमारास AICC मुख्यालयात जमतील आणि ते एकत्र बसमधून रामलीला मैदानाकडे रवाना होतील. दुपारी एकच्या सुमारास राहुल गांधी रॅलीला संबोधित करण्याची शक्यता आहे.

 

तसेच महागाईविरोधातील पक्षाचे आंदोलन रॅलीने थांबणार नाही तर 7 सप्टेंबरपासून (Septmber) म्हणजे येत्या बुधवापासून काँग्रेसची (Congress) ‘भारत जोडो यात्रा’ (Bharat Jodo Yatra) सुरू होणार आहे. कन्याकुमारी (Kanyakumari) ते काश्मीरपर्यंत (Kashmir) निघणाऱ्या या यात्रेत पक्षाच्या खासदारांसह अनेक काँग्रेस सदस्य सहभागी होणार आहेत, अशी माहिती या पत्रकार परिषदेदरम्यान (Press Conference) केसी वेणुगोपाल (K C Venugopal) यांनी दिली आहे. वेणुगोपाल म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला कुछल्याही गोष्टींची पर्वा उरलेली नाही. केंद्रातील सरकारचा एकमेव अजेंडा आमदारांना विकत घेण्याचा आहे. तरी मोठ्या संख्येन आज दिल्ली होणाऱ्या रॅलीत सामील होण्याचे जाहीर आवाहन वेणुगोपाल यांनी केले आहे. (हे ही वाचा:- Indian Economy World's 5th Largest Economy: ब्रिटेनला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था)

 

यापूर्वीही काँग्रेसने (Congress) 5 ऑगस्ट (August) रोजी महागाई (Inflation), बेरोजगारी (Unemployment) आणि जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी (GST) वाढीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. प्रामुख्याने राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) वड्रा यांच्यासह काँग्रेसचे अनेक बडे नेते काळ्या पोशाखात या आंदोलनात सहभागी झाले होते.