Sonia Gandhi (Photo Credit: PTI)

'मिनी लोकसभा' म्हणून पाहण्यात आलेल्या आणि नुकत्याच पार पडलेल्या देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूकीचा 10 मार्चला निकाल लागला आहे. या निवडणूकीमध्ये कॉंग्रेस पक्षाचा पाचही राज्यांमध्ये दारूण पराभव झाला आहे. या अपयशानंतर कॉंग्रेस पक्षात चिंतन बैठकीचे सत्र पार पडले आहे आणि आता त्याचे परिणाम दिसायला सुरूवात झाली आहे. कॉंग्रेसचे रणदीप सुरजेवाला (Randeep Singh Surjewala) यांनी ट्वीट करत काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड (Uttarakhand), पंजाब (Punjab), गोवा (Goa) आणि मणिपूरच्या (Manipur) प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे. PCC च्या फेररचनेसाठी यामुळे मार्ग सुकर होईल असेही सुरजेवाला यांनी ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

पंजाबच्या प्रदेशाध्यक्ष पदी नवज्योत सिंह सिद्धू होते. त्यांचाही निवडणूकीत पराभव झाला आहे तर उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोंदियाल यांनी राजीनामा दिला आहे. हे देखील नक्की वाचा: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीचं आमचे नेतृत्व करतील - मल्लिकार्जुन खरगे.

रणदीप सुरजेवाला ट्वीट

काँग्रेसच्या कार्य समितीची रविवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत राहुल गांधी, प्रियंका गांधी, पी. चिदंबरम, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत सोनिया गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याबाबत वक्तव्य केले होते पण काँग्रेसच्या कार्य समितीने त्यांच्या राजीनाम्याच्या प्रस्तावाला एकमताने नाकारलं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीमध्ये कॉंग्रेसचा पाचही राज्यात झालेल्या कामगिरीची आढावा घेण्यात आला. त्यानंतर आता हे राजीनामे कॉंग्रेसमधील खांदेपलटाचे मोठे संकेत ठरू शकतात.