महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. यातच पक्षाने शिवसेना पक्षाला पाठिंबा दिला नाही तर, महाराष्ट्रात काँग्रेस संपेल असा सूचक इशारा अशोक चव्हान (Ashok Chavan), बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), माणिकराव ठाकरे (Manikrao Thakre) आणि रजनी पाटील (Rajni Patil) यांनी सोनिया गांधी यांना दिला आहे. राष्ट्रपती राजवट लागू होण्याअगोदर भाजपने असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यापालांकडून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेनेला सत्ता स्थापनेबाबत आमंत्रण दिले होते. त्यावेळी काँग्रेसने पाठ फिरवल्यानंतर शिवसेना राज्यात सत्तास्थापन करण्यास असमर्थ ठरली. परंतु, काँग्रेसने शिवसेना पक्षाला पाठिंबा देऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असा दबाव टाकण्यात येत आहे. तसेच यावर सोनिया गांधी कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टाईम्स ऑफ इंडिया दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार नसल्या तरी त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची मते गांभीर्याने घेत आहेत. या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतही सत्तेबाबत सविस्तर चर्चा केली आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर राजकीय पक्षाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यातच काँग्रेसच्या बहुतेक 40 आमदारांनी उडी घेतली आहे, अशी माहिती समोर आली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याची काँग्रेसच्या हातात आली आहे. दरम्यान, पक्षाने ही संधी सोडली तर, महाराष्ट्रात काँग्रेस संपेल, असा सूचक इशारा पक्षनेत्यांकडून सोनिया गांधी यांना देण्यात आला आहे. काँग्रेसच्या या बैठकीनंतर सोनिया गांधी काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- वर्षा अखेरीस महाराष्ट्रात सत्ता स्थापन होणार? पाहा काय म्हणाले अजित पवार
दरम्यान, काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्षाची परस्परविरोधी विचारधारेचे आहेत. यातूनही काँग्रेसनेकडून शिवसेना पक्षाला पाठिंबा दिला तर, इतर राज्यातील अगामी निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसू शकतो, असे काँग्रेसचे कार्यकारिणीतील नेते एके अँटनी, मुकुल वासनिक, माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांचे म्हणणे आहे. यामुळे शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का नाही, असा प्रश्न गांधी कुटुंबियाच्या समोर उभा राहीला आहे.