'मुख्यमंत्री हा शिवसेना पक्षाचाच होणार!'- नवाब मलिक
Nawab Malik (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर कोणाचे सरकार स्थापन होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले. मुख्यमंत्रीपदावरुन भाजप- शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला होता. परिणामी, महाराष्ट्रात अजूनही सत्ता स्थापन झाले नाही. शिवसेना काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु, हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. यातच राष्ट्रवादी पक्षाचे (National Congess Party) आमदार नवाब मलिक (Nawab Malik) एक विधान करुन सर्वांचे लक्ष आकर्षित करुन घेतले आहे. दरम्यान, भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन संघर्ष पेटला होता. राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाले तर, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

नुकतीच नवाब मलिक यांनी एएनआय वृत्त संस्थेला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर मुख्यमंत्री कोणात्या पक्षाचा असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच मुख्यमंत्रीपदासाठीच शिवसेना-भाजप यांच्या वाद निर्माण झाला होता. त्यानुसार, शिवआघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार हे निश्चित आहे. भाजपने शिवसेना पक्षाचा अपमान केला आहे, त्यांना सन्मान देणे आमची जबाबदारी आहे, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. हे देखील वाचा- पुढचे 25 वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहावा ही इच्छा, पण आम्ही 'पुन्हा येईन..पुन्हा येईन' म्हणणार नाही: संजय राऊत

एएनआयचे ट्वीट-

भारतीय जनता पक्षाने राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी असमर्थता दर्शवल्यानंतर राज्यपालांकडून दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला आमंत्रण देण्यात आले होते. दरम्यान, शिवसेना सत्तास्थापनेचा करण्यास असमर्थ ठरल्यामुळे राष्ट्रवादीच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी देखील बहुमत सिद्ध करु न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. सध्या राजकीय वातावरण अधिक तापले असून महाराष्ट्रात कोणाची सत्ता स्थापन होणार असा प्रश्न जनतेला पडला आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्वाचे म्हणजे शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या आमदारांकडून पक्षाच्या जेष्ठ नेत्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. यावर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी काय निर्णय घेतली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.