Case against Prajwal Revanna's brother Suraj: प्रज्वल रेवन्नाचा भाऊ सूरज याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Image Credit: Wikipedia

लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांचा भाऊ जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदार सूरज रेवन्ना यांच्यावर लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 16 जून रोजी सूरज रेवन्ना याणी फार्महाऊसवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत एका व्यक्तीने शनिवारी हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा पोलीस ठाण्यात सूरजविरोधात गुन्हा दाखल केला.फिर्यादीत म्हटले आहे की, सूरज रेवण्णा याने त्याला आपल्या फार्महाऊसवर बोलावले आणि त्याने जबरदस्तीने त्याचे चुंबन घेतले आणि त्याचे ओठ आणि गाल चावले. (हेही वाचा - Renukaswamy murder case: अभिनेता दर्शन थुगुडेपा आणि अन्य तीन आरोपींना रेणुकास्वामी हत्या प्रकरणात 4 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी)

सूरजने मला सांगितले की तू या फार्महाऊसमध्ये एकटा आहेस. तुला माझ्या आणि आमच्या कुटुंबाबद्दल माहिती नाही. व जर तू सहकार्य केले नाही तर असे बोलून जीवे मारण्याची धमकी दिली.असे त्या व्यक्तीने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर सूरजने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला होता, त्याने त्याला जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या वाढण्यास मदत करू असे सांगितले.

आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी सूरजला नंतर या घटनेबद्दल मजकूर पाठवला होता आणि सूरजने काळजी करू नका, सर्वकाही ठीक होईल असे उत्तर दिले होते. याआधी शनिवारी, सूरज रेवन्ना आणि त्यांचे ओळखीचे शिवकुमार यांनी तक्रार दाखल केली होती की,लैंगिक अत्याचाराच्या खोट्या आरोपामुळे दोन लोकांकडून त्यांना ब्लॅकमेल केले जात आहेत.