महात्मा गांधी यांना पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणणं आली अंगाशी, भाजपा प्रवक्त्यांना पक्षाने दाखवला बाहेरचा रस्ता
BJP Madhya Pradesh Spokeperson Anil Saumitra (Photo Credits:Twitter/ANI)

भारतीय जनता पक्षाचे (Bhartiya Janata Party) प्रवक्ते (Spokepersoan) आणि मीडिया संपर्क आयोजक अनिल सौमित्र (Anil Saumitra) यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) हे  तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता (Father Of Nation) आहेत असं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी सौमित्र याना पक्षातून निलंबित व्हायची वेळ आलेली आहे. याशिवाय आपल्या विधानाचे स्पष्टीकरण देण्यासाठी भाजपा कडून सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे. आपल्या वैयक्तिक फेसबुक अकाऊंटवरून "ते (महात्मा गांधी) हे तर पाकिस्तानचे (Pakistan) राष्ट्रपिता आहेत, आपल्या देशात असे कोडयावधी पुत्र आहेत त्यातले काही लायक आहेत तर काही नालायक आहेत" अशा आशयाची एक पोस्ट सौमित्र यांनी केल्याने या नव्या वादाला तोंड फुटले आहे.

ANI ट्विट 

विधानामुळे होऊ शकणाऱ्या टीकेची तीव्रता लक्षात घेत भाजपाने तात्काळ सौमित्र यांना पक्षातून बेदखल केलेलं आहे. याची पुष्टी करताना भाजपाचे प्रवक्ते हितेश बाजपेयी यांनी सांगितले की, पक्षाच्या विचारसरणीशी सौमित्र यांच्या विचारांचा मेळ बसत नसल्याने त्यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंग यांनी पक्षातून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच देशातील जनतेच्या मनात महात्मा गांधींच्या बाबत एक भावनिक स्थान आहे अशा विधानांमुळे पक्षाच्या  प्रतिमेला डाग लागू  म्हणून तात्काळ कारवाई करण्यात आली आहे असे देखील बाजपेयी यांनी सांगितले.

 

याबाबत माध्यमांना माहिती देताना सौमित्र यांनी आपल्या विधानात काही गैर नसल्याचे सांगत काँग्रेस पक्षावर पलटवार केला. "आपल्या देशात राष्ट्रपिता अशी काही संकल्पना पूर्वीपासून नव्हती आपण सगळे भारत मातेचे पुत्र म्हणून ओळखले जातो. राष्ट्रपिता हा शब्द सुरवातीला कॉंग्रेस ने वापरला आणि त्या नावावर पुढे राजकारण केलं. याउलट भाजपाने पूर्णतः गांधींच्या विचारावर आधारित स्वच्छ भारत, स्वदेशी अश्या योजना राबिवल्या आहेत. आणि महात्मा गांधी हे भारताचे राष्ट्रपिता म्हणण्यामागे कारण हे की पाणी मोहम्मद अली जिन्हा आणि जवाहरलाल नेहरू या दोघांना पाकिस्तानची बांधणी करण्यास मदत केली होते त्यामुळे ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणवायला हवेत" या शब्दात अनिल सौमित्र यांनी आपली बाजू मांडली.