Birth anniversary of Atal Bihari Vajpayee being celebrated as Good Governance Day ( Photo Credits: PTI )

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज 94 वी जयंती आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस Good Governance Day म्हणून साजरा केला जातो. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मृत्यू पश्चात त्यांचा हा पहिलाच जन्मदिवस आहे. त्यांच्या जयंतीचं औचित्य साधत काल नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ विशेष नाण्याचं अनावरण केलं आहे. चलनात येणार नसलं तरीही अर्थ मंत्रालयाकडून ते विक्रीसाठी खुलं ठेवण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयींच्या स्मरणार्थ विशेष नाण्याचं लोकार्पण, पहा कसं आहे हे नाणं 

आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन आदरांजली वाहिली. ट्विटरच्या माध्यमातूनही अनेक मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, नितीन गडकरी, यांच्यासह वसुंधरा राजे, देवेंद्र फडणवीस यांनी अटल बिहारी वाजपेयींना आदरांजली वाहिली आहे.

नरेंद्र मोदींची आदरांजली 

नितीन गडकरी यांचं खास ट्विट 

सुरेश प्रभू यांची आदरांजली 

देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली 

 

भारतीय जनता पक्षाकडून भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान होणारे अटल बिहारी वाजपेयी हे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी तीन वेळेस भारताचं पंतप्रधान पद भूषवले आहे. 2014 सालापासून अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म दिवस म्हणून साजरा करण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केली आहे. 16 ऑगस्ट 2018 रोजी अटलजींचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये दीर्घ आजारपणात निधन झाले.