नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयींच्या स्मरणार्थ विशेष नाण्याचं लोकार्पण
नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयींच्या स्मरणार्थ विशेष नाण्याचं लोकार्पण (Photo Credits: (Photo-Twitter)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee)  यांच्या स्मरणार्थ खास  नाण बाजारात आणल आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं ऑगस्ट 2018 मध्ये दीर्घ आजारपणामुळे निधन झाले. उद्या अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 'Good Governance Day' म्हणून भाजपाकडून साजरा केला जाणार आहे. आज आयोजित कार्यक्रमामध्ये एल.के अडवाणी (L.K.Advani), अमित शहा (Amit Shah), केंद्रीय मंत्री महेश शर्मा (Mahesh Sharma) आणि अरूण जेटली (Arun Jaitley)  उपस्थित होते.

कसं असेल नाणं ?

अटल बिहारी वाजपेयींच्या स्मरणार्थ हे नाणं 35 ग्राम वजनाचं असेल. त्यावर अटलबिहारी वाजपेयींचा फोटो आहे. देवनागरी आणि इंग्रजी भाषेत त्यांचं नावं लिहलेलं आहे. एका बाजुला त्यांच्या फोटोसह त्यांचं जन्म मृत्यूचं वर्ष लिहलेलं आहे तर दुसर्‍या बाजूला सत्यमेव जयते लिहालेलं आहे. हे विशेष नाणं चलनात येणार नसून अर्थ मंत्रालयाद्वारा 3300 - 3500रूपयांमध्ये विकत घेता येईल. 35 ग्राम वजनाच्या या नाण्यात 50% चांदी, 40% तांबे, 5 % जस्त आणि अन्य धातूंचे मिश्रण असेल.

वयाच्या 93 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रूग्णालयामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधानपदाची शपथ घेणारे अटल बिहारी वाजपेयी हे पहिले नेते होते. त्यांनी तीन वेळेस भारताचे पंतप्रधानपद भूषवले आहे.