उपेंद्र कुशवाहा (Photo Credit; ANI)

मोदी सरकारमधून बाहेर पडलेले राष्ट्रीय लोक समता पार्टीचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाह (Upendra Kushwaha) यांनी युपीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधित बैठक गुरुवारी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पार पडली. बैठकीनंतर कुशवाहा यांनी महाआघाडीत प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बिहारमध्येही भाजपाला झटका मिळाला आहे.

बैठकीत उपेंद्र कुशवाहा यांच्यासह बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्तीसिंह गोहिल, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, हिंदुस्तान अवाम मोर्चाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी उपस्थित होते.

"माझ्याकडे अनेक पर्याय होते आणि युपीए हा त्यातील एक. पण राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांनी दाखवलेली आपुलकी यामुळे मी युपीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण सर्वात मोठे कारण म्हणजे बिहारच्या जनतेमुळे मी युपीएसोबत आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कुशवाहा यांच्या युपीएमधील प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आरएलएसपी तेलुगू देशम पार्टी (टीडीपी) नंतर एनडीएचा दुसऱ्या सहयोगी पक्षाने मोदी सरकारची साथ सोडली आहे.